रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.Rupali Chakankar writes letter to Modi; Give 50% discount on edible oil prices for Diwali as a sorghum seed wave
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये १५ रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच खाद्यतेलांच्या किंमती ऐन दिवाळीत बऱ्याच वाढल्या आहेत. त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेलांच्या किंमतींवर दिवाळी सणासाठी ५० टक्के सवलत देण्यात देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी या पत्रातून केली.
पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणाऱ्या पत्राविषयी रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत, उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील महिलांनी पत्राद्वारे दिलेली आर्त साद ऐकून आमची दिवाळी गोड करतील असा विश्वास यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
Rupali Chakankar writes letter to Modi; Give 50% discount on edible oil prices for Diwali as a sorghum seed wave
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान