विशेष प्रतिनिधी
पुणे : ऐरोली विधानसभेतील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जातेय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये गणेश नाईक यांच्या अटके संदर्भातील भाष्य केलं आहे.Rupali Chakankar says Ganesh Naik will be arrested, rape case filed
एका महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. गणेश नाईकांवर शनिवारी महिलेला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात नाईक यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यात आहे.
ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगाला ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महिलेने प्रत्यक्षात भेट घेऊन घडलेल्या घटनेचा सविस्तर वृत्तांत आणि तक्रार दिली होती.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन. राज्य महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करण्याचे निर्देश देऊन ४८ तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले.
त्यानुसार १५ तारखेला नवीन मुंबई पोलीस स्थानकामध्ये गणेश नाईक यांच्याविरोधात आयपीसी ५०६ (ब) हा गुन्हा दाखल झाला आहे.तसेच १६ तारखेला नेरुळ पोलीस स्थानकात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल झालाय. दोन्ही पोलीस स्थानकात दाखल झालेले गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून गणेश नाईक यांना अटक करुन पुढील चौकशी व कारवाई केली जाईल,” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.