महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत.Rupali Chakankar paid a surprise visit to Hadapsar police station
विशेष प्रतिनिधी
हडपसर : आज हडपसर येथील पोलीस स्टेशनला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अचानक भेट दिली आहे.त्यावेळी चाकणकर यांनी पोलिस स्टेशनमधील भरोसा सेल, दक्षता कमिटी, निर्भया पथक आणि दामिनी पथक यांची माहिती घेतली.महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत. सकाळी ते रात्री पर्यंत सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि बाजारात ही पथके गस्तीवर असतात.
यावेळी रुपाली चाकणकर म्हणाल्या की, हडपसर मध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिला, आयटी कंपनी मध्ये महिला कामगार संख्या मोठी आहे.दरम्यान येथील महिलांना काही समस्या असल्यास त्यांनी तत्काळ १०९१ या हेल्पलाईन नंबर वर तसेच महिला आयोगाच्या मेलवर तक्रार द्यावी ,असे आवाहन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
सध्या महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसदलातील यंत्रणा अधिक सतर्क करण्यात येत असून पोलिसदलाच्या वतीने हेल्पलाइन सुविधेत मोबाईल नंबर, व्हॉट्सऍप आणि टोल फ्री नंबरचा समावेश करण्यात आला आहे.