सकाळी भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसिद्ध गायक सोनू सूद यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली.Rupali Chakankar infected with corona
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून राजकीय नेते तसेच अभिनेते कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत.अशातच राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही कोरोना झाल्याची माहिती आहे.
तसेच सकाळी भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आणि प्रसिद्ध गायक सोनू सूद यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली.रुपाली चाकणकर यांनी कोरोना झाल्याची माहिती स्वत: ट्विट करत दिली आहे.
“सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन”, असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलंय.