नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुन्हा सोडून पुडी, सूत्रे जाऊ लागली सुनेत्रा चरणी!!, असेच राजकीय चित्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिसून आले. NCP factions
आज 28 मार्च रोजी अजित पवारांच्या अकाली एक्झिटला दोन महिने पूर्ण झाले. त्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या सगळ्या जुन्या आठवणी जागविणारी पोस्ट लिहिली. ती सगळीकडे व्हायरल झाली.
– “पवार बुद्धीची” सूत्रे सुनेत्रा चरणी
या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुडी पवार बुद्धीच्या माध्यमांनी आज पुन्हा सोडून दिली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होऊ शकते यासाठी पुन्हा चर्चा सुरू करायची गरज आहे. सुनेत्रा पवारांशी चर्चा सुरू केली पाहिजे, अशा बातम्या पवार बुद्धीच्या माध्यमातून वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या. याचा अर्थ पवार मोदीच्या माध्यमांची सूत्रे सुनेत्रा पवारांच्या चरणाशी जायला तयार असल्याचे दिसून आले.
– “बाहेरून आलेल्या पवार”
शरद पवारांनी ज्या सुनेत्रा पवारांना “बाहेरून आलेल्या पवार” ठरविले होते, त्यांच्याच चरणाशी जाऊन चर्चा करायची पाळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आल्याचे या घडामोडीमुळे स्पष्ट झाले. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या पदावर काम सुरू केले. भाजपने त्यांना नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रकारचे बळ दिले. सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित झाले. त्यामुळे त्यांच्याशीच चर्चा करायची राजकीय अपरिहार्यता निर्माण झाली. शरद पवारांच्या पुढे आणि त्यांच्या राष्ट्रवादीकडे दुसरा पर्याय उरला नाही. म्हणूनच सुनेत्रा पवारांशी चर्चा करायची राजकीय पुडी आज सुटली.
– घड्याळ चिन्हाला अपयश
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचा विलीनीकरणाला विरोध होता कारण त्यांना आपल्या सत्तेतला वाटा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना मिळू द्यायचा नव्हता. पण अजित पवारांनी सांगितल्यावर त्या नेत्यांना माघार घ्यावी लागली असती. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा पहिला टप्पा म्हणून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवारांनी घड्याळाच्या चिन्हावर लढविल्या होत्या. पण महापालिका निवडणुकीत त्यांना दारुण अपयश आले. पुणे आणि पिंपरी महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा अजित पवारांना यश मिळू शकले नाही.
– रोहित पवारांची आगपाखड
जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रिया दरम्यानच अजित पवारांची अकाली एक्झिट झाली आणि राष्ट्रवादींच्या विलीनीकरण प्रक्रियेला जबरदस्त धक्का लागला. दोन्ही राष्ट्रवादींचे नेते एकमेकांवर तुटून पडले. पवार कुटुंबीय सोडून इतरांनी एकमेकांचे जबरदस्त वाभाडे काढले. यात पवार कुटुंबीयांमध्ये रोहित पवार जास्त आघाडीवर राहिले कारण त्यांना हातात तोंडाशी आलेला सत्तेचा घास गमवावा लागला. म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर वारंवार आगपाखड केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दुरापास्त होऊन गेले.
– राजकीय अपरिहार्यता
या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित झाल्यानंतर त्यांच्याशीच चर्चा झाली आणि त्यांनी मान्यता दिली, तरच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल ही राजकीय अपरिहार्यता आणि अनिवार्यता लक्षात घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची पुडी आज पुन्हा सुटली. ही पुडी सोडण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सूत्रे सुनेत्रा चरणी गेली म्हणूनच त्याच्या बातम्या “पवार बुद्धीच्या” मराठी माध्यमांनी दिल्या. त्यापलीकडे या बातम्यांना अन्य कुणीही हवा दिली नाही.
Rumors of a merger between the two NCP factions surface once again.
महत्वाच्या बातम्या
- अशोक खरात प्रकरण भोवलं; रूपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा!
- LPG Charges : हॉटेल-रेस्टॉरंट बिलात स्वतंत्रपणे LPG शुल्क जोडू शकणार नाही; सरकारने म्हटले- असे केल्यास कारवाई
- पल्स 2026 : महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग; आरोग्य सेवेतील गुणवत्तेवर भर
- अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे; महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही लागणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती