Rudrawar Couple of Beed Dies In America : अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या अंबाजोगाईतील रुद्रवार दांपत्याचा अर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या दांपत्याची अवघी चार वर्षांची मुलगी गॅलरीत येऊन रडत होती. पोलीस तपास सुरू असतानाच आता अमेरिकी माध्यमांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकी माध्यमांनुसार, बालाजी रुद्रवार यांनीच आपल्या पत्नीला चाकूने भोसकले आणि त्यानंतर स्वत:चे जीवन संपवले आहे. Rudrawar Couple of Beed Dies In America, US media claims that husband killed his wife
विशेष प्रतिनिधी
बीड : अमेरिकेत नोकरीनिमित्त वास्तव्याला असलेल्या अंबाजोगाईतील रुद्रवार दांपत्याचा ऑर्लिंग्टन येथे संशयास्पद मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर या दांपत्याची अवघी चार वर्षांची मुलगी गॅलरीत येऊन रडत होती. पोलीस तपास सुरू असतानाच आता अमेरिकी माध्यमांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकी माध्यमांनुसार, बालाजी रुद्रवार यांनीच आपल्या पत्नीला चाकूने भोसकले आणि त्यानंतर स्वत:चे जीवन संपवले आहे.
पती-पत्नीचा मृत्यू झाल्यावर एकटीच रडत होती चिमुरडी
बालाजी रुद्रवार आणि त्यांच्या पत्नी आरती रुद्रवार हे अमेरिकी न्यूजर्सीमधील अर्लिंग्टनमध्ये राहत होते. या शहरात अनेक भारतीय मोठ्या संख्येने राहतात. रुद्रवार दांपत्याला चार वर्षांची एकुलती एक मुलगी आहे. मृत्यूवेळी आरती या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या, अशीही माहिती समोर आली आहे. या दांपत्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकी माध्यमांचा दावा…
अमेरिकी माध्यमांनी असा दावा केला आहे की, बालाजी यांनीच आपली पत्नी आरती यांचा खून केला. बालाजी यांनी आधी आरतीवर धारदार शस्त्राने वार केला. जीव वाचवण्यासाठी जेव्हा आरती पळत होत्या तेव्हा त्यांनी आरती यांच्या पोटात चाकूने भोसकले. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन आरती यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येनंतर बालाजी यांनी स्वत:लाही संपवल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.
पोलिसांना पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा
तथापि, पोलिसांनी अद्याप या खूनाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तपासानंतरच या दोघांच्या मृत्यूबद्दल निष्कर्ष काढता येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
Rudrawar Couple of Beed Dies In America, US media claims that husband killed his wife
महत्त्वाच्या बातम्या
- PHOTOS : बालपणी देश सोडावा लागला, दुसऱ्या महायुद्धात गाजवले शौर्य, असे झाले प्रिन्स फिलिप यांचे सम्राज्ञीशी लग्न
- Prince Philip Death : ब्रिटनच्या राजघराण्यावर शोककळा, राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे निधन
- राज्यात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन लागणार : वडेट्टीवार
- राफेल डीलमध्ये कथित दलाल सुषेण गुप्तांना 2014च्या आधीच झाले पेमेंट; मिन्हाज मर्चंट यांचा सवाल, मग कोणता चौकीदार चोर होता?
- अमेरिकी नौदलाची विनापरवानगी भारतीय सागरी हद्दीत मोहीम, मुत्सद्दी संबंधांवर परिणामांची शक्यता