• Download App
    आरोग्य विभागाचे डोके फिरले, कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांच्या किटमध्ये रबरी लिंग|Rubber sex toy in the kit of Asha workers, a counselor for family planning

    आरोग्य विभागाचे डोके फिरले, कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांच्या किटमध्ये रबरी लिंग

    विशेष प्रतिनिधी

    अकोला : कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागानं दिलेल्या किटमध्ये रबरी लिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळे महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसंच कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.Rubber sex toy in the kit of Asha workers, a counselor for family planning

    कुटुंब नियोजनासाठी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. मात्र, हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जाणार कशा असा आशा सेविकांचा प्रश्न आहे.



    हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा. आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रूपये रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून. थोडी लाज ठेवा.मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका.

    Rubber sex toy in the kit of Asha workers, a counselor for family planning

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!