विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओमिओक्रॉनबाबत राज्यात पूर्णपणे दखल घेतली जात आहे. मुंबई विमानतळावर आतपर्यंत ८०० जणांची RTPCR चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २८ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.RTPCR test of 800 peoples at Mumbai airport, samples of 28 positive sent for genomic sequencing: Tope
एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे. कर्नाटक सिमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. केंद्र घेईल त्याप्रमाणे राज्य निर्णय घेईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.याशिवाय नागरीकांनी काळजी घ्यावी असेही टोपे म्हणाले.
मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात १२ तर पुण्यातील लॅबमध्ये १६ असे एकूण २८ नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी देण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त आले नाहीत. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
नगर आगीचा अहवाल आला नाही
नगर येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या घटनेचा अहवाल आलेला नाही. तो देण्यासंदर्भात मी विनंती करेन. तेथील कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याच कारण नाही. ऑक्सीजन अभावी राज्यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. १नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली असून त्यांचं सर्व्हेक्षण करण्याचं काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्याची तपासणी सुरु असल्याचे टोपे म्हणाले.
RTPCR test of 800 peoples at Mumbai airport, samples of 28 positive sent for genomic sequencing: Tope
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारचा निर्णय ; मिळणार Z दर्जाची सुरक्षा
- कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी RTPCR ची सक्ती; महाराष्ट्रात मात्र तपासणीशिवायच प्रवेश
- लातूर : अखेर एसटी वाहक महिला कर्मचाऱ्याचे निलंबन घेतले मागे
- आंध्र प्रदेश, ओडिशाला धडकणार चक्रीवादळ जवाद सज्ज, १०० हून अधिक रेल्वे रद्द, पर्यटनस्थळांवर न जाण्याचा सल्ला