विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. RSS meeting IN PUNE
ही बैठक 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित करण्यात येते.शि. प्र. मंडळीच्या स.प. महाविद्यालय परिसरात ही बैठक होणार आहे.
या बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह रा.स्व. संघाचे सर्व पाच सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत संघप्रेरित 36 विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्र सेविका समिति, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटना बैठकीत सहभागी होतील. या सर्व संघटना आणि त्यांच्याशी संबंधित पदाधिकारी समाज जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सेवा, समर्पण आणि राष्ट्र भावनेने सक्रिय असतात.
गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगडमधील रायपुर इथं आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व संघटना समाजजीवनातील विविध पैलूंबाबत त्यांचे अनुभव व कार्य याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय परिस्थितीसोबतच सामाजिक समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सेवा कार्य, सामाजिक, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विविध विषयांवर विस्तृत चर्चा होणार आहे. सामाजिक परिवर्तनाच्या विविध क्षेत्रांमध्ये करावयाच्या कार्यांबाबतही यावेळी चर्चा केली जाईल.
RSS meeting in pune
महत्वाच्या बातम्या
- भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री
- PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार
- मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!