नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात पंच परिवर्तनाचा सूत्रपात केला असला, तरी संघाने तेवढ्यापुरताच शताब्दी वर्षाचा उपक्रम मर्यादित ठेवलेला नाही. पंच परिवर्तनाच्या सामाजिक उपक्रमाच्या पलीकडे जाऊन संघाने diplomatic and administrative mission हाती घेतले असून या उपक्रमाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयाम दिला आहे. साधारणपणे आत्तापर्यंत संघाने हाती न घेतलेला किंवा हाती घेऊन देखील फारशी प्रसिद्धी न केलेला हा उपक्रम आहे. यावेळी संघाने कात टाकली आहे. संघाने diplomatic आणि administrative outreach वाढवायचे ठरविले आहे. RSS centenary
– पठडीच्या पलीकडे
संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कवायत, संघ म्हणजे सेवा या पठडीच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय diplomatic circles मध्ये सकारात्मक शिरकाव करण्याचा संघ प्रयत्न करतोय. तसाही संघाने विविध घटनात्मक संस्थांवर कब्जा केल्याचा आरोप राहुल गांधी करतातच. पण तो आरोप सर्वस्वी खरा असता, तर संघाचे आणि देशाचे राजकीय आणि सामाजिक चित्र अधिक वेगळे आणि ठळक दिसले असते. घटनात्मक संस्थांवर संघाचा खरा प्रभाव दिसला असता. पण त्या आरोपामध्ये फारसे तथ्य नाही. कारण संघाने घटनात्मक संस्थांकडे, प्रशासन किंवा राजनैतिक वर्तुळाकडे फारसे लक्ष दिले नव्हते. उलट त्यापासून फटकून राहण्याचा संघाचा “अनावश्यक स्वभाव” राहिला होता. पण सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणतात, त्याप्रमाणे देश काल परिस्थिती बदलली. त्याप्रमाणे संघालाही बदलावे लागले म्हणून संघाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशासकीय आणि राजनैतिक वर्तुळामध्ये सकारात्मक शिरकाव करण्याचा प्रयत्न चालविलाय. पण या वर्तुळांवर कब्जा करण्याची बात तर दूरच, निदान संघाविषयीचे गैरसमज दूर करावेत. संघाचे काम आणि तत्त्वज्ञान यांची मूलभूत माहिती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रशासकीय आणि राजनैतिक वर्तुळाला first hand मिळावी, असा यातून प्रयत्न होताना दिसतोय.
– रंजन गोगोई, कंवल सिब्बल, कपिलदेव
संघाने शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजातल्या प्रभावी व्यक्ती, नेते, कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा outreach वाढवायचा निर्णय घेतला असून आता त्यामध्ये विविध देशांच्या राजदूतांचा, राजनैतिक अधिकाऱ्यांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा देखील समावेश केला आहे. राजधानी नवी दिल्लीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा संवाद कार्यक्रम 26, 27 आणि 28 या 3 दिवसांत विज्ञान भवनात होणार असून या कार्यक्रमासाठी संघाने समाजातल्या प्रभावशाली व्यक्तींना निमंत्रित केले आहे. यामध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई, माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल, वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिलदेव, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आदींचा समावेश आहे.
– अमेरिका + चीनच्या राजदूतांना निमंत्रण
याखेरीज संघाने outreach आणखी वाढविला असून अमेरिकेपासून चीन पर्यंत सगळ्या मोठ्या देशांच्या राजदूतांना, वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील निमंत्रित केले आहे. संघाने देशातल्या सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधला असून त्यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींना देखील या संवाद कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. यापैकी अनेकांनी आपली उपस्थिती सुनिश्चित केली आहे. भारताच्या शेजारील देशांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश केला आहे. एकूण 1300 निमंत्रित या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार असून पहिल्या दोन दिवशी डॉ. मोहन भागवतांचे संबोधन आणि तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम अशी या संवाद कार्यक्रमाची रूपरेषा आहे. दिल्लीतल्या कार्यक्रमानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, कोलकाता आणि बेंगलोर मध्ये अशाच स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत.
RSS centenary, diplomatic and administrative mission on
महत्वाच्या बातम्या
- हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, नितेश राणेंची सुप्रिया सुळेंना ताकीद
- CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक
- राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!
- Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त