प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील आशा वर्कर्सना दिवाळीत प्रथमच भाऊबीजेचा लाभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आशा वर्कर्सना ५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश ठाणे महापालिकेस दिले. त्यानुसार, सर्व प्रक्रिया पूर्ण करून विनाविलंब हे अनुदान खात्यात जमा करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. Rs 5000 welfare grant to Asha workers in Chief Minister’s station
ठाणे महापालिका कार्य क्षेत्रात ३४६ आशा वर्कर्स आहेत. त्यांच्या शिष्टमंडळाने माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी सानुग्रह अनुदानासह काही मागण्या त्यांच्याकडे मांडल्या. त्यावर, मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ ठाणे महापालिका आयुक्तांना त्याबद्दल सूचना दिल्या.
तसेच, 5000 रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाबददल आशा वर्कर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेवर सुमारे १७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे.
Rs 5000 welfare grant to Asha workers in Chief Minister’s station
महत्वाच्या बातम्या
- गोव्यात नरकासुर दहन; अयोध्येत रामलल्लांचे दर्शन; उज्जैन मध्ये महाकाल पूजन
- कर्नाटकातही हलाल विरोधात आंदोलन जोरावर; हिंदू उतरले रस्त्यावर!!
- नोकरीची संधी : महावितरण विभागात परीक्षेविना केली जाणार निवड, असा करा अर्ज
- CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद