• Download App
    आईला शेवटचा सॅल्युट करून आर.आर.पाटील यांचे बंधू पोलीस सेवेतून निवृत्त, भाऊ गृहमंत्री असतानाही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम|RR Patil's brother retires from police service, last salute to mother

    आईला शेवटचा सॅल्युट करून आर.आर.पाटील यांचे बंधू पोलीस सेवेतून निवृत्त, भाऊ गृहमंत्री असतानाही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : भाऊ बारा वर्षे गृहमंत्री आणि राज्यातील वजनदार नेता.मात्र तरीही 20 वर्षे साईड ब्रॅंचला काम करणारे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे बंधू राजाराम पाटील पोलीस सेवेतून निवृत्त झाले. आपल्या आईला शेवटचा सॅल्यूट त्यांनी केला.RR Patil’s brother retires from police service, last salute to mother

    आर.आर.पाटील म्हणजेच राजाराम पाटील यांची काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयातून कोल्हापूर परिसरातील करवीर येथे डीवायएसपी म्हणून नियुक्ती झाली होती. तेथूनच ते निवृत्त झाले. ज्या आई ने लहानच मोठं करून इथपर्यंत पोहचवल त्या आई ला ड्युटीवर जात असताना त्यांनी सॅल्युट केला अन निवृत्तीच्या दिशेने पाऊल टाकलं.



    राजराम पाटील यांची पोलीस सेवा ही ३३ वर्ष झाली असून स्वतःचा सख्खा भाऊ १२ वर्षे गृहमंत्री असतानाही त्यांनी २० वर्षे साइड ब्रँचला काम केले. त्यांना ६५१ बक्षिसे, दोन वेळेस राष्ट्रपती पदक मिळालेले आहेत.

    फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजाराम पाटील यांचे कौतुक करत पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना शाब्दिक टोला लगावला होता. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. दिवंगत आर. आर. पाटील हे १२ वर्षे गृहमंत्री होते. त्यांचे सख्खे बंधू सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील हे गृहामंत्र्यांचा भाऊ म्हणून कधीच मिरवले नाहीत.

    ते अत्यंत संयमी आणि शांत व्यक्ती आहेत, अशा शब्दांत त्यांचे कौतुक केलं होते. गृहमंत्री लांबून नातेवाईक असला तरी सर्व डिपार्टमेंट चालवत असतो, असा टोला त्यांनी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना लगावला होता. राजाराम पाटील यांनी भाऊ गृहमंत्री असताना देखील २० वर्षे साईड ब्रँचला काम केले, असे अजित पवार यांनी तेव्हा आवर्जून सांगितले होते.

    RR Patil’s brother retires from police service, last salute to mother

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा