विशेष प्रतिनिधी
मुंबई : रिपाइं (आठवले) व भारतीय जनता पार्टीची गेल्या दहा वर्षांपासून युती आहे. तरीही रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये अजिबात सन्मान मिळत नसून लोकसभा व विधानसभेमध्ये पक्षाला एकही जागा मिळाली नाही. पक्षाला वारंवार डावलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या(आठवले) विदर्भातील कार्यकर्त्यांनी आम्ही आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासोबत आहोत, पण या निवडणुकीमध्ये भाजपासोबत राहणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी दिली. पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांना तसे पत्रही लिहिले आहे.
नुकत्याच ३०-३२ महामंडळाच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या नियुक्त्या केल्या. त्यात पक्षाला स्थान नाही. तर विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांच्या नियुक्त्या झाल्या व पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या.पण रिपाइंचा विचार केला गेला नाही. 28 तारखेला भाजप उमेदवारांनी नागपूरच्या संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत असताना त्या पवित्र ठिकाणी गरज नसताना चुकीच्या घोषणा दिल्या. पण उमेदवारांनी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये व आंबेडकरी-रिपब्लिकन जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आरएसएस स्वयंसेवक, रिपाइंचे उमेदवार कसे?
भाजपने कलिनाची जागा रिपाइंला सोडल्याची घोषणा केली. आठवलेंनी त्याप्रमाणे जाहीर केले. त्या जागेवर अमरजित सिंह यांनी भाजपतर्फे “कमळ”या चिन्हावर भाजपचा ए. बी. फॉर्म लावून अर्ज भरलेला आहे. ते भाजपचे उपाध्यक्ष असून आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आहेत. ते रिपाइंचे उमेदवार कसे असू शकतात? हा प्रश्न रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केला आहे.
Rpi Athwale group upset, will not Campaign For Mahayuti
महत्वाच्या बातम्या
- राजकारणापेक्षाही महिला सन्मान अधिक महत्त्वाचा, अरविंद सावंतांवर कठोर कारवाई करा; राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरांच्या मुंबई पोलिसांना सक्त सूचना!!
- Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात फटाक्याच्या स्फोटात 1 ठार, 6 जखमी; स्कूटरवरून फटाक्यांचे कार्टून पडताच IED बॉम्बसारखा स्फोट
- Ghatkopar Parag Shah : भाजपचे घाटकोपरचे उमेदवार पराग शहा राज्यात सर्वात श्रीमंत; 550 कोटींवरून 3385 कोटींवर पोहोचले
- Nepal : नेपाळचे नोटा छापण्याचे कंत्राट चिनी कंपनीला; 100 रुपयांच्या 30 कोटी प्रती छापणार