• Download App
    Rotten in the alliance, victimized in the alliance; but why did it take Uddhav Thackeray युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरेंना 35 वे वर्ष का लागले??

    युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरेंना 35 वे वर्ष का लागले??

    Uddhav Thackeray,

    नाशिक : युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरे यांना 35 वे वर्ष का लागले??, असे विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे आली.Uddhav Thackeray,

    उद्धव ठाकरे आज बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले. तिथे त्यांनी शिवसैनिकांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी युती आणि आघाडी या दोन्हींच्या विषयी तक्रार केली. युती आणि आघाडी यांच्या राजकारणाची शिवसेना बळी ठरली. परंतु, आता पुण्यात पुणेकरांना हवे असेल, तर शिवसेना स्वतंत्रपणे उभारतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आतापर्यंत स्वतंत्र शिवसेना उभारली नाही म्हणून त्यांनी पुणेकरांची माफी मागितली.



    पण युती किंवा आघाडी विषयी उद्धव ठाकरेंनी तक्रार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी भाजपशी फाटल्यानंतर उद्धव ठाकरे जाहीरपणे युतीमध्ये शिवसेना 25 वर्षे सडली असेच म्हणाले होते. त्यामुळे “सडलेली” शिवसेना “सुधारण्यासाठी” त्यांनी भाजपची युती तोडली. पण सत्तेच्या संजीवनीसाठी शरद पवारांच्या नादी लागून महाविकास आघाडी बांधली. या महाविकास आघाडीची सत्ता उद्धव ठाकरे यांना फक्त अडीच वर्षे भोगता आली. त्या पलीकडे उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे सरकार चालवता आले नाही. पण त्यासाठी महाविकास आघाडीत आळंन् बळं घुसलेले काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष कारणीभूत ठरले नाहीत, तर खुद्द उद्धव ठाकरेंची शिवसेनाच फुटल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. परंतु तेव्हा आघाडीच्या राजकारणात शिवसेनेचा बळी गेला, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले नव्हते. कारण भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय सोबत करण्यात त्यांना कधी गैर वाटले नाही.

    पण शिवसेना ज्यावेळी 25 वर्षे युतीत सडली, त्यावेळी त्यातली किमान 20 वर्षे तरी बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व होते. त्यावेळी बाळासाहेबांना शिवसेना युतीत सडल्याचे वाटले नव्हते. उलट युतीतल्या भाजपला कमळाबाई म्हणून खेळवण्यात त्यांना धन्यता वाटत होती. त्यावेळी बाळासाहेबांना शिवसेनेचे पूर्ण बहुमताचे स्वतंत्र कर्तृत्व दाखविता आले नव्हते. त्यांना भाजपा बरोबरच्या युतीतच ते साध्य झाले होते. पण काही झाले तरी बाळासाहेबांनी शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला मोठा राजकीय आकार दिला आणि सत्तेची खुर्ची दाखवली हे सत्य नाकारून चालणार नाही.

     उद्धव ठाकरे अनुभवातून नाही शिकले

    पण उद्धव ठाकरे यांना ते कर्तृत्व दाखवता आले नाही. त्यांना ना स्वतंत्रपणे उभे राहता आले, ना युतीमध्ये मित्र धर्म निभावता आला. म्हणून त्यांना शिवसेना युतीत सडल्याचे वाटले. आघाडीतून मिळालेली सत्ता फक्त अडीच वर्षे टिकल्याने आघाडीचे आपला बळी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण शरद पवार यांच्यासारख्या बेभरवशाच्या खेळाडूवर विश्वास टाकल्यानंतर दुसरे काय होणार??, याचा अनुभव अनेकांनी घेतल्यानंतर सुद्धा पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या मराठी म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे आधीच्या अनुभवातून शिकले नाहीत म्हणून त्यांनी पवारांसारख्या बेभरवशाच्या खेळाडूवर विश्वास ठेवून भाजपला दगा दिला आणि महाविकास आघाडी केली तिथे अडीच वर्षात आपटी खाल्ली आणि म्हणून आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत शिवसेना युती आणि आघाडीचे बळी ठरली, असे त्यांना म्हणावे लागले त्यापलीकडे काही घडले नाही.

    Rotten in the alliance, victimized in the alliance; but why did it take Uddhav Thackeray 35 years to understand this after eating and drinking everywhere??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Manoj Jarange : मनोज जरांगे काँग्रेसच्या भूमिकेवर संतप्त, थेट राहुल गांधींना दिला पक्षाचा सुफडा साफ होण्याचा इशारा

    पवार संस्कारित नेते एकमेकांची झाकतात; बाळासाहेब संस्कारित नेते एकमेकांची काढतात; पण राजकीय आरोप – प्रत्यारोपांमध्ये गुन्हे दडपून जातात!!

    ओव्यांपासून रंगभूमीपर्यंत, साहित्य, संस्कृती आणि विचारांचे वैभव; मुंबईत मराठी भाषा सप्ताह 2025 चे उदघाटन