Thursday, 1 May 2025
  • Download App
    रोहित पवारांना चपराक, आदिनाथ साखर कारखाना घेण्याचा डाव सर्वसाधारण सभेत सभासदांनी पाडला हाणून|Rohit Pawar's plot to take Adinath sugar factory was thwarted by the members in the general meeting

    रोहित पवारांना चपराक, आदिनाथ साखर कारखाना घेण्याचा डाव सर्वसाधारण सभेत सभासदांनी पाडला हाणून

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा डाव कारखान्याच्या सभासदांनीहाणून पाडला आहे. हा कारखाना बारामती अ‍ॅग्रो कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा यापूर्वी झालेला ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत रद्दबातल ठरविण्यात आला. या ठरावामुळे पवार व त्यांच्या समर्थकांना चपराक बसली आहे.Rohit Pawar’s plot to take Adinath sugar factory was thwarted by the members in the general meeting

    आदिनाथ सहकारी साखर कारखाना मागील काही वर्षांपासून बंद आहे. कर्जाचा डोंगर वाढला असताना ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगारांची देणी थकीत आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने उभारलेला हा साखर कारखान्याचा कारभार कधी जगताप गटाकडे तर बागल गटाकडे असताना दोन वर्षांपूर्वी कारखाना बंद पडला.



    सध्या हा कारखाना दिग्विजय बागल गटाकडे आहे. बागल हे यापूर्वी राष्ट्रवादीत असताना बारामती अ‍ॅग्रो कंपनीने आदिनाथ साखर कारखाना १५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय झाला होता. बागल गट राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यानंतर आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर बारामती अ‍ॅग्रो कंपनीला चालविण्यास देण्याचा विषयही फारशा हालचाली न होता मागेच पडला होता. भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्यास विरोध वाढू लागला.

    आदिनाथ बचाव कृती समितीने यासंदर्भात कारखान्याची सर्वसाधारण सभा बोलावून निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली. ऑनलाईन पध्दतीने झालेल्या या सभेस एकूण सुमारे ३२ हजार शेतकरी सभासदांपैकी जेमतेम ३१४ इतकेच सभासदांनी उपस्थिती दर्शविली.

    गणसंख्यापूतीर्ची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयावर मतदान घेण्यात आले. तेव्हा एकूण उपस्थितांपैकी २८२ शेतकरी सभासदांनी कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास तीव्र विरोध केला. तर ३४ सभासदांनी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देण्याच्या बाजूने समर्थन दिले.

    आदिनाथ बचाव कृती समितीचे निमंत्रक हरिदास डांगे यांनी आदिनाथ कारखाना कवडीमोल दराने घशात पाडून घेण्याचा डाव सभासद शेतकऱ्यांनी हाणून पाडल्याचा दावा केला. आता संचालक मंडळाने पुढील कार्यवाही करावी आणि बहुसंख्य सभासद शेतकऱ्यां च्या इच्छेनुसार कारखाना स्वत: चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    Rohit Pawar’s plot to take Adinath sugar factory was thwarted by the members in the general meeting

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!

    Chief Minister Fadnavis : जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने सामाजिक न्यायाचे पर्व सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही केले निर्णयाचे स्वागत

    Sarsanghchalak : सरसंघचालकांच्या हस्ते काशीमध्ये मजुराच्या मुलीचे कन्यादान; वराला म्हणाले- माझ्या मुलीची काळजी घ्या!