• Download App
    Rohit Pawar रोहित पवारांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी करणे नडले; गुन्हा दाखल!!

    रोहित पवारांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी करणे नडले; गुन्हा दाखल!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्यानंतर घडलेल्या सगळ्या एपिसोड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली. पोलीसच आपल्याला उलट बोलत आहेत, असा आव आणून रोहित पवारांनी आवाज खाली करा. हातवारे करून बोलू नका. शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल तर बोलू नका, अशा शब्दांमध्ये पोलिसांना दमदाटी केली. रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील पोलिसांना दमबाजी करत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे रोहित पवारांच्या दादागिरीच्या विरोधात सगळीकडे प्रचंड संताप उमटला. पण आता पोलिसांनीच रोहित पवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. Rohit Pawar

    पोलीस बॉईज संघटनेने रोहित पवारांच्या दादागिरी विरुद्ध आवाज उठविला. तुम्ही एका राजकीय परिवारात जन्माला आलात म्हणून पोलिसांवर दादागिरी करायचे लायसन्स घेऊन आलात का??, असा परखड सवाल पोलीस बॉईज संघटनेने रोहित पवारांना केला. रोहित पवारांच्या विरोधात आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी दिला. रोहित पवार यांच्या विरोधात ३५३ कलमाखाली गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

    – जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोलिसांमध्ये दाखल गुन्हा!!

    विधिमंडळाच्या आवारात झालेल्या मारामारीच्या प्रकरणात पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचा समर्थक कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांनी त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नये म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली आडवे झाले. त्यांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यापूर्वी पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेतली. या सगळ्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रचंड चिडचिड झाली. आमदार रोहित पवारांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवर दादागिरी केली.



    भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या भांडणाचे परिणाम विधिमंडळाच्या आवारातल्या मारामारीत झाले. यामध्ये दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पण पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि अन्य कार्यकर्त्यांच्या विरोधात सुरुवातीला गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ता नितीन देशमुखला अटक केली. पोलिसांनी त्याला अटक करू नये आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊ नये म्हणून जितेंद्र आव्हाड विधिमंडळाच्या आवारातच पोलिसांच्या गाडीसमोर बसले त्यावेळी त्यांचे समर्थक त्यांच्या बाजूला जमा झाले होते त्यानंतर जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली गेले. त्यांनी नितीन देशमुखला सोडवायचा प्रयत्न केला. सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी पोलिसांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेतली.

    रोहित पवारांची पोलिसांवर दादागिरी

    मात्र, या सगळ्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांनी प्रचंड चिडचिड व्यक्त केली. त्यांनी विधानसभा अध्यक्षांवर आणि सरकारवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला, पण त्याच वेळी आमदार रोहित पवार यांनी आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांवरच दादागिरी केली. नितीन देशमुखला पोलीस कुठे नेतायेत हे पाहायला आम्ही त्यांच्या मागे गेलो होतो. परंतु पोलिसांनी आम्हाला ठिकाणी फिरवले नितीन देशमुखचा ठाव ठिकाणा लागू दिला नाही, असा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवारांनी पोलिसांवर पोलीस स्टेशनमध्येच जाऊन प्रचंड चिडचिड केली. पोलिसांना आवाज खाली करा अशी दमदाटी करताना त्यांचा स्वतःचाच आवाज चढला होता. म्हणूनच पोलिस बॉईज संघटना त्यांच्या विरोधात आक्रमक झाली.

    अखेर पोलिसांनी या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा आणि दादागिरी केल्याचा गुन्हा दाखल केला.

    Rohit Pawar was not allowed to go to the police station and bully the police; a case was registered!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Solapur : सोलापुरात धर्मांतरासाठी महिलांना पैशांचे आमिष; फादरवर गुन्हा दाखल

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- माणिकराव कोकाटेंचे बोलणे चुकलेच, त्यांनी काहीही सांगितले तरी आमच्यासाठी भूषणावह नाही!

    Chief Minister Fadnavis : क्रिएटर्स इकॉनॉमीचे जागतिक केंद्र बनण्याकडे महाराष्ट्र अग्रेसर, मुख्यमंत्र्यांची माहिती