• Download App
    Rohit Pawar जामखेड मध्ये रोहित पवारांचा पराभव; तासगाव मध्ये आर आर आबांचा मुलगा रोहित पाटलाला दणका; शरद पवारांच्या दोन तरुण शिलेदारांचे कथित बालेकिल्ले उद्ध्वस्त!!

    जामखेड मध्ये रोहित पवारांचा पराभव; तासगाव मध्ये आर आर आबांचा मुलगा रोहित पाटलाला दणका; शरद पवारांच्या दोन तरुण शिलेदारांचे कथित बालेकिल्ले उद्ध्वस्त!!

    नाशिक : शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले. जामखेडच्या मतदारांनी रोहित पवार यांनी उभ्या केलेल्या पॅनलचा दणकून पराभव केला, तर तासगाव मध्ये आर आर आबा पाटील यांचा मुलगा रोहित पाटलाला दणका बसला. Rohit Pawar

    शरद पवार नेहमीच भाकरी फिरवतात तरुणांना संधी देतात असा गाजावाजा करून पवारांनी प्रत्यक्षात घराणेशाहीतल्याच दोन तरुणांना विधानसभा निवडणुकीत संधी दिली होती. यापैकी रोहित पवार तर त्यांचे नातूच होते. पण रोहित पवारांचा जामखेड मतदार संघातून कसाबसा 1200 मतांनी विजय झाला होता. तिथे अजित पवारांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेण्याचे टाळून आपल्या पुतण्याला अप्रत्यक्ष मदत केली होती.

    – रोहित पवारांचा पराभव

    पण याच रोहित पवारांना जामखेडची नगरपरिषद मात्र हातात राखता आली नाही. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अतिशय चतुराईने रणनीती आखत शरद पवारांच्या नातवाच्या पॅनेलचा तिथे पराभव केला. रोहित पवारांच्या चेलाचपाट्यांनी राम शिंदे यांचा उल्लेख फ्युज उडालेला बल्ब कसा केला होता. तो प्रचार त्यांच्यावर उलटला. राम शिंदे यांनी उभ्या केलेल्या पॅनलचे 15 उमेदवार निवडून आले, तर रोहित पवारांच्या पॅनलचे 9 उमेदवार निवडून आले. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. बारामतीतून उठून जामखेड मध्ये राजकीय घुसखोरी करणाऱ्या रोहित पवारांना मतदारांनी दणका दिला. रोहित पवारांच्या जामखेड मधल्या पराभवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा निर्णायक ठरली. त्यांनी राम शिंदे यांना विधानसभेतल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी मोठी मदत केली.

    – आबांच्या मुलाचा पराभव

    दुसरीकडे तासगाव मध्ये आर आर आबांचा मुलगा रोहित पाटील याला सुद्धा मतदारांनी जोरदार दणका दिला. तिथे माजी खासदार संजय काका पाटलांच्या पॅनलने रोहित पाटलांच्या स्वाभिमानी पॅनलला पराभवाची धूळ चारली. आता तासगावातल्या पोस्टर बॉईजचा पंचनामा सुरू करतो असा इशारा संजय काका पाटील यांनी दिला. रोहित पाटील याने खासदार विशाल पाटील यांच्याबरोबर हातमिळवणी करून पॅनल उभे केले होते. पण रोहित पाटलाच्या मदतीला खासदार सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांच्या पक्षातले बाकीचे नेते गेले नाहीत. त्यामुळे रोहित पाटलाला एकाकीपणे निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत घरच्या मैदानावर पवारांच्या तरुण शिलेदाराला मतदारांनी धूळ चारली.

    Rohit Pawar was defeated in Jamkhed.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दिल्लीतून “राजकारण” साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मतदारांचा जोरदार धक्का!!

    ठाकरे + पवारांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सोडले वाऱ्यावर; आले सात आणि आठ वर; महाराष्ट्रातल्या गावांनी ठाकरे आणि पवार ब्रँडची लावली वाट!!

    Chhagan Bhujbal : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा दावा- शरद पवारांनीच भुजबळांना तुरुंगात पाठवले; धनंजय मुंडेंनाही पाठवण्याची होती इच्छा