विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठीत एक म्हण पारंपरिक आहे, आयजीच्या जीवावर बायजी उदार सासूच्या मालमत्तेवर जावई सुभेदार!!… पण आता ही म्हण बदलून आधुनिक मराठीत नवी म्हण तयार झाली आहे, “आईच्या जीवावर बायजी उदार; मॅक्सवेलच्या खेळीवर भिजलेले पवार सुभेदार!!”, ही ती म्हण आहे. Rohit pawar unnecessarily compared sharad pawar with glen Maxwell
कारण अफगाणिस्तान विरुद्ध खेळला ग्लेन मॅक्सवेल, द्विशतक केले त्याने, ऑस्ट्रेलियाला पराभवाच्या खाईतून ओढून विजयाच्या शिखरावर नेऊन ठेवले ते मॅक्सवेलच्या पराक्रमाने…, पण त्यामुळे आमदार रोहित पवारांना आठवले आपले भिजलेले आजोबा!!
रोहित पवारांनी ग्लेन मॅक्सवेलच्या विक्रमी अद्वितीय कामगिरीची तुलना शरद पवारांच्या पावसात भिजून राष्ट्रवादीचे 53 आमदार निवडून आणण्याशी केली आहे.
परिस्थिती कितीही विरोधात असली तरी वेदनांना काढून त्यावर हास्याचा लेप लावत स्टेशन लढावच लागतं. नुसतं लढावंच लागतं असं नाही, तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो. अशावेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते. मग ते क्रिकेटचे मैदान असो राजकीय, हेच काल ग्रेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं!!, अशी पोस्ट रोहित पवारांनी करून शरद पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक केले.
मागे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन असेच एका प्रचार सभेत पावसात भिजले होते. त्यावेळी देखील रोहित पवारांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बायडेन यांची तुलना शरद पवारांशी करून पवारांचे पावसात भिजले असे फोटो शेअर केले होते. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत बाकी कोणीही मात करून विजय मिळवला, तर राष्ट्रवादीचे नेते त्या व्यक्तीची तुलना शरद पवारांशी करून मोकळे होतात.
पण पावसात भिजून जो बायडेन अमेरिकेचे सारख्या बलाढ्य महासत्तेचे अध्यक्ष झाले. ग्लेन मॅक्सवेलने 201 धावा करून धावांचे ट्रिपल डिजिट गाठले. पण पवारांनी साताऱ्यातल्या पावसात भिजून 53 आमदार निवडून आणून राष्ट्रवादीचे डबल डिजिट “मेन्टेन” केले. नेमका हाच फरक रोहित पवार त्यांच्या राजकीय सोयीने विसरले आणि ग्रामपंचायत निवडणुकीत आपटूनही गिरे तो भी टांग उपर करून बसले!!
Rohit pawar unnecessarily compared sharad pawar with glen Maxwell
महत्वाच्या बातम्या