विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Rohit Pawar “बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते.Rohit Pawar
बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार. आम्ही निवडणुकीला उभे राहिलो होतो तेव्हा आम्हाला मिळालेले यश हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावामुळेच मिळाले होते. अजित पवार यांना मिळाले होते तेवढेच मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळावे. त्यांनी बोलावले किंवा नाही बोलावले तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी व आमचीही इच्छा असल्यामुळे आम्ही प्रचार करू.Rohit Pawar
खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती
अशोक खरात प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. खरातला अनेक बड्या नेत्यांची नावे माहिती आहेत. त्यांनी काय केले हे खरातला माहिती आहे. २८ रोजी अजित पवार यांचे निधन झाले. २७, २८ आणि २९ जानेवारीला त्याच्या बँक खात्यांत मोठी उलाढाल झाली कशी, कोण नेता कशासाठी येत होता, कुठल्या हेतूने तेथे पूजा करण्यात येत होत्या, या सर्व गोष्टी खरातला माहिती असल्यामुळे ही माहिती काही लोकांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे उद्या त्याची आत्महत्या झाली असे दाखवण्यात येईल किंवा एन्काउंटरमध्ये त्याला मारले जाईल, अशी भीती आम्हाला वाटते, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
Baramati Bypoll: Rohit Pawar to Campaign for Sunetra Pawar Despite No Invite
महत्वाच्या बातम्या
- वारकरी संप्रदायात घुसले होते अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार!!
- ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा; शिक्षणाचा नवा दीपस्तंभ!!
- Elon Musk : व्हॉट्सॲप वाचत आहे तुमचे खासगी मेसेज; मस्क म्हणाले- हे विश्वासार्ह नाही, कोर्टात भरपाईची मागणी
- SpiceJet : स्पाइसजेटमध्ये 20% कर्मचाऱ्यांची कपात होणार; वरिष्ठ अधिकाऱ्यांना जानेवारीपासून पगार मिळालेला नाही