• Download App
    Baramati Bypoll: Rohit Pawar to Campaign for Sunetra Pawar Despite No Invite रोहित पवार म्हणाले- बारामतीत प्रचाराला जाणार; निवडणूक अजित पवार यांच्या कामावर होत आहे

    Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले- बारामतीत प्रचाराला जाणार; निवडणूक अजित पवार यांच्या कामावर होत आहे

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : Rohit Pawar  “बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते.Rohit Pawar

    बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार. आम्ही निवडणुकीला उभे राहिलो होतो तेव्हा आम्हाला मिळालेले यश हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नावामुळेच मिळाले होते. अजित पवार यांना मिळाले होते तेवढेच मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळावे. त्यांनी बोलावले किंवा नाही बोलावले तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी व आमचीही इच्छा असल्यामुळे आम्ही प्रचार करू.Rohit Pawar



     

    खरातचा एन्काउंटर होईल अशी भीती

    अशोक खरात प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी. खरातला अनेक बड्या नेत्यांची नावे माहिती आहेत. त्यांनी काय केले हे खरातला माहिती आहे. २८ रोजी अजित पवार यांचे निधन झाले. २७, २८ आणि २९ जानेवारीला त्याच्या बँक खात्यांत मोठी उलाढाल झाली कशी, कोण नेता कशासाठी येत होता, कुठल्या हेतूने तेथे पूजा करण्यात येत होत्या, या सर्व गोष्टी खरातला माहिती असल्यामुळे ही माहिती काही लोकांना अडचणीत आणू शकते. त्यामुळे उद्या त्याची आत्महत्या झाली असे दाखवण्यात येईल किंवा एन्काउंटरमध्ये त्याला मारले जाईल, अशी भीती आम्हाला वाटते, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

    Baramati Bypoll: Rohit Pawar to Campaign for Sunetra Pawar Despite No Invite

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही; पवारांचे राज्यासाठी योगदान मोठे, पण त्यांचा पिंड निधर्मी; CM फडणवीसांची टीका

    CM Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- महिलांना आरक्षण देणे हीच महात्मा फुलेंना खरी आदरांजली, ज्योती-सावित्री जि. प. शाळेचे उद्घाटन

    Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादचा केंद्रीय यंत्रणेकडून गोपनीय तपास:; बड्या कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू