• Download App
    Rohit Pawar म्हणे, अजितदादांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्र्यांची घुसखोरी; "पोस्टर वरचे मुख्यमंत्री" रोहितदादांनी "पवार बुद्धी" पाजळली!!

    म्हणे, अजितदादांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्र्यांची घुसखोरी; “पोस्टर वरचे मुख्यमंत्री” रोहितदादांनी “पवार बुद्धी” पाजळली!!

    मुंबई : म्हणे, अजितदादांच्या अर्थ खात्यात मुख्यमंत्रीची घुसखोरी; “पोस्टर वरचे मुख्यमंत्री” रोहितदादांनी “पवार बुद्धी” पाजळली!!

    कर्जत जामखेड पालिकेची सत्ता हातातून निसटल्यानंतर मध्यंतरी फारच “हायपर लोकल” झालेले “पोस्टर वरचे मुख्यमंत्री” रोहित पवार आता पुन्हा महाराष्ट्र आणि देशाच्या मैदानात येऊन मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना उपदेश करू लागले. याचे प्रत्यंतर त्यांनी केलेल्या एका ट्विटमधून आले. या ट्विटमध्ये त्यांनी स्वतःला नसलेली अक्कल म्हणजेच “पवार बुद्धी” पाजळली हेच उघड झाले.

    त्याचे झाले असे :

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण सिंह परदेशी या निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून केली. मुख्यमंत्र्यांचा जो अधिकार आहे, तो त्यांनी वापरला. पण प्रवीण सिंह परदेशी यांच्या नियुक्तीवरूनच रोहित पवारांनी एक ट्विट केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी केल्याचे म्हटले. आता इथून पुढे प्रवीण सिंह परदेशी या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच राज्याचे निर्णय होणार. अजित पवारांचे महत्त्व राहणार नाही. ही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या अर्थ खात्यात केलेली घुसखोरी आहे, असा दावा रोहित पवारांनी या ट्विटमधून केला. याआधी गेल्या अडीच वर्षांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत ढवळाढवळ केली आणि आता अजित पवारांचा नंबर लावला असा “जावईशोध” “पवार बुद्धी”च्या रोहित पवारांनी लावला.

    पण असले काड्या घालण्याचे उद्योग करताना रोहित पवार मुख्यमंत्र्यांचे मूलभूत घटनात्मक अधिकाराच विसरले. कुठल्याही राज्याचे मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालते. मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसारच कुठलेही मंत्री त्या पदावर टिकून राहू शकतात किंवा त्यांना बाजूला व्हावे लागते. मंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नसतात, तर मुख्यमंत्र्यांचे अधिकार मंत्र्यांवर चालतात, हे सत्य आणि तथ्य “पवार बुद्धी”च्या रोहित पवारांना माहिती तरी नसावे किंवा ते मुद्दामून विसरले असावेत, असे वाटते.

    त्याही पलीकडे जाऊन ज्या अजितदादांच्या अर्थ खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घुसखोरी केल्याचे रोहित पवार म्हणतात, ते अजित पवार काही मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेबाहेरचे “स्वतंत्र आणि सार्वभौम” अर्थमंत्री नाहीत. शिवाय ते एकट्याच्या राजकीय कर्तृत्वाच्या बळावर राज्याचे अर्थमंत्री झालेले नाहीत, तर ते भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आले आणि भाजपने त्यांना सत्तेच्या वळचणीला येऊ दिले म्हणूनच अजितदादा अर्थमंत्री होऊ शकले. अन्यथा त्यांना रोहित पवारांच्याच बाजूला विरोधी बाकावर फारतर विरोधी पक्षनेता म्हणून बसता आले असते. आणि अजितदादाच काय पण अन्य कुठलाही नेता अर्थमंत्री असता, तरी त्यांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे ऐकावेच लागले असते, त्यांना दुसरा पर्याय राहिला नसता, या पवारांना काट्यासारखे बोचणाऱ्या सत्याकडे रोहित पवारांनी पाठ फिरवून काड्या घालणारे ट्विट केले. पण या ट्विटला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कुणी महत्त्व दिले नाही.

    Rohit Pawar targets chief minister Devendra fadnavis, but forgets is constitutional power

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस