नाशिक : महाराष्ट्रातल्या नगरपंचायती, नगरपरिषदांच्या काही निवडणुका बिनविरोध झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना लोकशाही टिकण्याविषयी चिंता वाटायला लागली. त्यांनी पत्रकार परिषदांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट मधून ती चिंता जाहीरपणे व्यक्त केली.
पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीत आठ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 20 – 20 लाख रुपये देऊन गप्प बसवले. त्यांना माघार घ्यायला लावली. याविषयी मात्र सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी चकार शब्द उच्चारला नाही. बारामतीतल्या लोकशाही विषयी त्यांना कुठलीच “चिंता” वाटली नाही.
नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपने 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. तीन नगराध्यक्ष ही बिनविरोध केले. त्यामुळे लोकशाही विषयी चिंता वाटणारी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली. नागपूर मधल्या पत्रकार परिषदेत सुद्धा लोकशाही विषयीच्या चिंतेचा पुनरुच्चार केला.
- Eknath Shinde : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन
– रोहित पवारांची गिरीश महाजनांवर टीका
रोहित पवारांनी बारामती किंवा माळेगाव प्रचारात लक्षच घातले नाही. त्यांनी फक्त जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले. तिथल्या प्रचारात ते मग्न राहिले. बाकीच्या ठिकाणच्या बिनविरोध निवडणुकीवरून भाजपवर आणि महायुतीवर शरसंधान साधले. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी नाशिक मधल्या तपोवन आतल्या 1700 झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आगपाखड केली. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांच्या आवाजात आवाज मिसळला.
– लोकशाही वाचविण्याच्या नुसत्या पोकळ बाता
पण बारामतीत अजितदादांनी आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 उमेदवार 20 – 20 लाख रुपये देऊन बाजूला काढले. त्यावरून युगेंद्र पवारांनी आवाज उठविला. पण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना युगेंद्र पवारांच्या आवाजात आवाज मिसळावासा वाटला नाही. आपल्याच पक्षातल्या 4 उमेदवारांना पैसे चारून बाजूला काढण्याचा त्यांनी निषेध केला नाही. अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले नाही. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी लोकशाही वाचविण्याच्या नुसत्या पोकळ बाता मारल्या.
Rohit Pawar Supriya sule didn’t target Ajit Pawar over Baramati election
- महत्वाच्या बातम्या