विशेष प्रतिनिधी
मुंबई : धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा अनन्वित छळ करून मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीला उखडून फेकण्याची हिंदुत्ववाद्यांनी तयारी चालवली असताना शरद पवारांचा आमदार नातू औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ बाहेर आलेत. औरंगजेबाची कबर हे एक प्रतीक आहे अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी कबर उखडून फेकण्याला विरोध दाखवला आहे. औरंगजेबाच्या कबरीला सध्या एसआरपीएफ ने संरक्षण दिले आहे.
आम्हाला औरंगजेबाची कबर उखडून फेकायची आहे, पण काँग्रेसच्या राजवटीत त्या कबरीला आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने कायदेशीर संरक्षण दिले. त्यामुळे कायद्यानुसार तरी सध्या राज्य सरकारला तसे करता येत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीची “बाबरी मशिद” करू, असे म्हणून तिथे कारसेवा करायचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर एसआरपीएफने औरंगजेबाच्या कबरीला सध्या संरक्षण दिले आहे. पण शरद पवारांचे नातू आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या समर्थनार्थ समोर आलेत. औरंगजेबाला महाराष्ट्रात राहूनही इथे राज्य करता आले नाही याचे ती कबर म्हणजे प्रतीक आहे. त्यामुळे ती उखडून फेकू नये, अशी मखलाशी करत रोहित पवारांनी औरंगजेबाच्या कबरीचे समर्थन केले.
Rohit Pawar supports Aurangzeb tomb
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde काँग्रेसची एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर; अजित पवारांनाही साद, नाना पटोलेंचा प्रस्ताव
- Pawan Kalyan ‘भारताला फक्त दोन नव्हे तर अनेक भाषांची गरज आहे’,
- तामिळनाडूमध्ये १००० कोटींचा मद्य घोटाळा! EDच्या छाप्यांनंतर भाजपने स्टॅलिनला घेरले
- उत्तर भारतीयांना मुलं जन्माला घालण्याखेरीज दुसरे काम नाही; हिंदी द्वेषापोटी तमिळनाडूच्या मंत्र्याचे अनर्गल प्रलाप!!