विशेष प्रतिनिधी
मुंबई : Rohit Pawar राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी पक्षात व पवार कुटुंबात देखील अनेक हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. परंतु, या सगळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार सावध भूमिका घेताना दिसत आहे. तसेच त्यांनी अजितदादांचा तेरावा होईपर्यंत कुठलेही राजकीय भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.Rohit Pawar
रोहित पवार म्हणाले, अजितदादांची बातमी आपण ऐकली, बातमी खरी आहे का स्वप्न आहे हे आम्हालाही कळत नाही. आजपर्यंत आम्ही त्या दुःखात आहोत, त्या विमानात आणखी जे होते त्यांचाही परिवार दुःखात आहे. काही दिवसांपूर्वी कळले की, दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडके हे अजित दादांचे आणि साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. जेव्हा त्यांना अजित दादांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा अस्वस्थ झाले नंतर ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. आज पवार परिवार आणि हा परिवार दुःखात आहे. त्यामुळे मी बोडके कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, असे रोहित पवार म्हणाले.Rohit Pawar
तेरावा झाल्यावर पत्रकार परिषद घेणार
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, तेरावा ज्या दिवशी होईल, त्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन सांगेल, आता राजकीय बोलणे योग्य नाही. दादांसोबत काय चर्चा झाली, सगळ्या प्रक्रियेत मी होतो. मात्र तेरा दिवसांनी सांगेल, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे व्हारल व्हिडिओमध्ये रोहित पवार आणि अजित पवारांचे काय बोलणे झाले, याबाबत त्यांनी बोलणे टाळले आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात विचारले असता रोहित पवारांनी परखड मत मांडले आहे. ते म्हणाले, अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वेगळा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेताना पक्षाचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल होते. या नेत्यांची सुनेत्रा काकी यांच्याशी चर्चा झाली असेल, राजकारणात अनुभव कमी असला तरी त्या अनेक वर्षांपासून समाजकारणात काम करतात.
शपथविधीचे आम्हाला माहित नव्हते
तसेच शपथविधी होणार असल्याचे आम्हाला कोणालाही माहित नसल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. लाखो लोक बारामतीमध्ये पवार कुटुंबाला भेटण्यासाठी येत होते. पार्थ देखील होता. संपूर्ण महाराष्ट्र येऊन भेटत नाही, सांत्वन करत नाही तोपर्यंत आपण बारामतीत थांबले पाहिजे. आम्हाला शपथविधीची बातमी देखील टीव्हीच्या माध्यमातून समजली, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.
No Politics Until 13th Day Rituals: Rohit Pawar on Ajit Pawar’s Demise
महत्वाच्या बातम्या
- दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!
- Gautam Adani : अदानींनी यूएस-कोर्टाची नोटीस 15 महिन्यांनंतर स्वीकारली; फसवणुकीच्या प्रकरणात 90 दिवसांत उत्तर द्यावे लागेल
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले??, देवेंद्र फडणवीसांनी उलगडले तपशील!!
- केंद्रीय अर्थसंकल्पातून विकासित भारताकडे दमदार पाऊल, महाराष्ट्राला मिळणार सुमारे 1 लाख कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती