• Download App
    Rohit Pawar लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Rohit Pawar  जर पोलिसांचा वापर गुन्हेगारांना वठणीवर आणण्याऐवजी केवळ स्वतःचं राजकारण सरळ करण्यासाठी केला, तर गुन्हेगारांची पोलिसांना शिवीगाळ करण्याची आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्याची हिंमत का होणार नाही?” असा थेट आणि अत्यंत कडक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारला विचारला आहे.Rohit Pawar

    लातूरमधील पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या गुन्हेगारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत रोहित पवारांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचा आरोप केला आहे.Rohit Pawar



    लातूरमधील व्हिडिओचा दाखला

    रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन करताना, शिवीगाळ करताना आणि हुज्जत घालताना दिसत आहेत. या व्हिडिओचा दाखला देत रोहित पवार म्हणाले की, लातूरमधील या धक्कादायक व्हिडिओमध्ये जे दिसतंय, ते अत्यंत चिंताजनक आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तामुळेच आज गुन्हेगारांचे धाडस पोलिसांवर हात टाकण्याइतके वाढले आहे.

    पोलीस प्रशासनातील राजकीय हस्तक्षेप थांबवा!

    राज्य सरकारवर हल्ला चढवताना रोहित पवार पुढे म्हणाले, “सध्याच्या सरकारने आतातरी जागे होण्याची गरज आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामात आणि तपासात चालणारा राजकीय हस्तक्षेप तात्काळ थांबवला पाहिजे. पोलिसांना त्यांचे काम पूर्ण स्वातंत्र्याने करू दिले, तरच राज्यात कायद्याचे राज्य राहील.” गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही आणि सरकार फक्त स्वतःचे राजकीय हित पाहत असल्याचा आरोप करत त्यांनी गृहविभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

    Rohit Pawar Slams Mahayuti Govt Over Viral Video of Criminals Arguing with Latur Police

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Ketan Agrawal : पुणे हत्याकांडात दावा- केतनचे डोके चिरडलेले होते; रेस्क्यू टीमचा सदस्य म्हणाला- लोक रडत होते, पण सिया शांत होती; आई-वडिलांची चौकशी

    Mumbai Police : मुंबईतील मोहर्रमच्या जुलूसमध्ये विषारी कॅप्सूलचे वाटप; पुण्याच्या तरुणाला अटक, 14 हजार 900 गोळ्या जप्त; मोठा घातपात टळला