• Download App
    Rohit Pawar याला म्हणतात, खानदानी हुशारी; पण काकांची हिंदी कच्ची असल्याचे सांगून पुतण्याने त्यांची इज्जत वाढविली की घालविली??

    याला म्हणतात, खानदानी हुशारी; पण काकांची हिंदी कच्ची असल्याचे सांगून पुतण्याने त्यांची इज्जत वाढविली की घालविली??

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणातले पवार खानदान राजकीय मखलाशा करण्यात आणि कोलांट उड्या मारण्यात कसे “तयार” आहे, याचे वर्णन परस्पर वैचारिक विरोधक असलेले भाऊ तोरसेकर आणि राजू परुळेकर हे दोन ज्येष्ठ पत्रकार एकमताने करत असतात. शरद पवार habitual liar आहेत, असे वर्णन राजू परुळेकर करत असतात, तर त्यांचे वैचारिक विरोधक भाऊ तोरसेकर वेगळ्या शब्दांनी पवारांचा नित्याचा खोटेपणा उघड्यावर आणत असतात. पण राजकारणात खेळी चुकली किंवा एखादे वक्तव्य चुकले, तर त्याची जाहीरपणे कबुली देऊन पुढे जाण्यापेक्षा पवार खानदानातले लोक एकमेकांना वेगवेगळ्या मखलाशा करून सावरून घेतात, याचे प्रत्यंतर रोहित पवारांच्या ताज्या वक्तव्यातून आले. Rohit Pawar

    -पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करणे अजितदादांवर शेकले

    अंजना कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी करण्याच्या प्रकरणात अजितदादा अडकले. त्यांच्या राष्ट्रवादीच्या करमाळा तालुका प्रमुखाच्या बेकायदा खनन प्रकरणात लक्ष घालणे त्यांना महागात पडले. त्यांनी तरुण आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवायची अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची धमकी दिली. पण तो ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजितदादा अडचणीत आले. राज्याचा उपमुख्यमंत्री एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला अशोभनीय दमदाटी करतोय, हे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचले आणि अजितदादांना माघार घेणे भाग पडले. कर्तव्य बजावणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे म्हणावे लागले. अजितदादांच्या पाठोपाठ त्यांचे बडबोले आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा आपले शब्द आणि तक्रार माघारी घ्यावी लागली. एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याने अजितदादांना असे “सरळ” केले.



    रोहित पवारांना सहन होईना

    नेमके हेच अजितदादांचे पुतणे रोहित पवारांना सहन झाले नाही. पण सहन झाले नाही आणि सांगता येत नाही, अशी स्थिती झाल्यामुळे रोहित पवारांनी वेगवेगळ्या शब्दांनी अजितदादांची पाठराखण सुरू केली.

    आजच्या पत्रकार परिषदेत तर रोहित पवारांनी नवीनच “जावईशोध” लावला. अजितदादांची म्हणे हिंदी कच्ची असल्यामुळे ते अडचणीत सापडले, असा दावा रोहित पवारांनी केला. करमाळा प्रकरणात महिला पोलीस अधिकारी चुकल्या असे मी अजिबात म्हणणार नाही. पण त्या अधिकाऱ्यांना मराठी समजत नव्हते आणि अजितदादांचे हिंदी कच्चे होते. पण अजितदादा त्यांच्याशी हिंदीत बोलले. तिथेच सगळा घोटाळा झाला, असे रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. म्हणजे अजितदादांच्या दमदाटीची भाषा रोहित पवारांनी त्यांच्या कच्च्या हिंदीवर ढकलली. अजितदादाही चुकले नाहीत आणि महिला पोलीस अधिकारीही चुकल्या नाहीत, असे म्हणून त्यांनी नरो वा कुंजरो वा, अशी हात वर करणारी भूमिका घेतली. नेमकी हीच पवार खानदानाची अतिहुशारी ठरली.

    काकांची इज्जत घालविली की वाढविली??

    एरवी बारामतीत आपण “शैक्षणिक क्रांती” घडवून आणली वगैरे बाता मारणाऱ्या पवार खानदानाचे हिंदी कच्चे आहे, याची कबुली देताना सुद्धा रोहित पवारांना काही लज्जा वाटली नाही. अजितदादा गेली 40 वर्षे तरी सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात आहेत. त्यापैकी किमान दोन दशके ते उपमुख्यमंत्री आहेत. तरीदेखील त्यांना हिंदी शिकता आले नाही. अजितदादा इंग्रजी तर कधी बोलतच नाहीत. त्यामुळे त्यांचे इंग्रजी पक्के की कच्चे हा सवाल विचारायचा प्रश्नच उद्भवत नाही, पण अजितदादांचे हिंदी कच्चे आहे. याकडे बोट दाखवून रोहित पवारांनी आपल्या काकांची राजकीय इज्जत वाढविली की घालविली??, याचा मात्र विचार करायची महाराष्ट्रावर वेळ आली आहे.

    Rohit Pawar says, Ajit Pawar’s Hindi language is raw

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सगळ्यांचेच संख्याबळ तोकडे, म्हणूनच कुठे, काय मिळते का बघायला मातोश्रीवर भेटले!!

    Hake Pandit controversy : “हाके हा मोकाट कुत्रा ” ; हाके पंडित वादात पुन्हा ठिणगी ?

    Rohit Pawar : रोहित पवारांचा हल्लाबोल- सर्वांना मान्य असणारा जीआर काढला तर हा ओबीसींचा वाद का? छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का?