• Download App
    Rohit Pawar saw the "selfishness" in Praful Patel only after the possibility of merger faded!! विलीनीकरणाची शक्यता मावळल्यानंतरच रोहित पवारांना दिसला प्रफुल्ल पटेलांमधला "स्वार्थ"!!

    विलीनीकरणाची शक्यता मावळल्यानंतरच रोहित पवारांना दिसला प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ”!!

    Rohit pawar

    नाशिक : जोपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे वारे वाहून तसे घडून येण्याची शक्यता होती, तोपर्यंत रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधला “स्वार्थ” दिसला नव्हता, पण विलीनीकरणाची शक्यता मावळल्या बरोबर रोहित पवारांना प्रफुल्ल पटेलांमधल्या “स्वार्थाचा साक्षात्कार” झाला!!Rohit Pawar saw the “selfishness” in Praful Patel only after the possibility of merger faded!!

    – केजरीवालांची भेट, ममतांची अपॉइंटमेंट

    अजित पवारांच्या विमाना अपघाताचा विषय घेऊन रोहित पवारांनी आधी महाराष्ट्रभर राजकीय थैमान घातले, पत्रकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशन सादर केली, पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हिंग लावून विचारले नाही. त्याचवेळी रोहित पवारांनी दिल्लीत धाव घेतली. त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांना अजित पवारांच्या विमान अपघातात लक्ष घालायला सांगितले. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधींना सुद्धा या विषयात ओढून पाहिले. पण राहुल गांधींनी त्यांना अजून तरी धूप घातली नाही. त्यानंतर रोहित पवारांनी ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेतली.



    – मराठी माध्यमांनी उकळत ठेवला विषय

    पण एवढे सगळे करूनही अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय रोहित पवारांना आणि शरद पवारांना अपेक्षित असा राष्ट्रीय पातळीवर तापलाच नाही. तो फक्त महाराष्ट्र पातळीवर मराठी माध्यमांनी उकळत ठेवला.

    – प्रफुल्ल पटेलांकडे मागितले स्पष्टीकरण

    त्यामुळे रोहित पवारांनी आता थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. अरविंद केजरीवाल यांची सकाळी भेट घेऊन आल्यानंतर रोहित पवारांनी काल सायंकाळी सोशल मीडिया पोस्ट मधून प्रफुल्ल पटेल यांना “स्वार्थी” म्हटले. त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. तुम्ही रोहित सिंगच्या लग्नाला राजस्थानात गेला होतात तिथे कोणते नेते आले होत??, रोहित सिंगचे कुणाशी संबंध होते??, हे सगळे तुम्हाला माहिती आहे याची माहिती तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगाल अशी अपेक्षा तेव्हाच तुम्ही स्वार्थी आहात की अजित पवार प्रेमी आहात, हे कळेल, असे रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्ट मध्ये नमूद केले.

    – शरद पवार गट सत्तेच्या लाभापासून वंचित

    दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची शक्यता मावळल्यानंतरच रोहित पवारांना प्रफुल्ल पटेल यांच्यातला “स्वार्थ” दिसला तोपर्यंत त्यांना पटेलांमधला “स्वार्थ” दिसला नव्हता. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर काहीही करून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे एकीकृत राष्ट्रवादीचे नेतृत्व शरद पवारांकडे द्यायचे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांना सत्तेतले लाभार्थी करायचे, असा चंग शरद पवारांच्या गटाने बांधला होता, पण सुनेत्रा पवार, पार्थ पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या चार नेत्यांनी भाजपच्या बळकट पाठिंब्याच्या आधारे शरद पवार गटाचा मनसूबा उधळून लावला. त्यामुळे शरद पवारांच्या गटातले सगळे नेते सत्तेच्या लाभापासून वंचित राहिले.

    – विलीनीकरण हाणून पाडले म्हणून…

    अगदी शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारीच्या वेळी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा प्रयत्न झाला, पण तो सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी हाणून पाडला. त्यामुळे शरद पवारांच्या गटातले नेते चडफडत राहिले. जयंत पाटलांचे नेमके याच वेळी डोळे आले. त्यामुळे विधानसभेत अर्थसंकल्प सादर होताना ते हजर सुद्धा हजर राहिले नाहीत, तर रोहित पवारांनी चडफड आणि संतापातूनच प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध सोशल मीडिया पोस्ट केली. त्यात त्यांना “स्वार्थी” म्हणून घेतले. त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची पत्रकार परिषद मागितली. पण हे सगळे विलीनीकरणाच्या अभावातून घडून आले. तरीसुद्धा भाजप किंवा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांच्या चडफडाटाला कुठलीही किंमत दिली नाही.

    Rohit Pawar saw the “selfishness” in Praful Patel only after the possibility of merger faded!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Pawar : VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला गेला होतात का? रोहित पवारांचा प्रफुल पटेलांना सवाल, म्हणाले – तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी?

    Sunetra Pawar : महिलांच्या तक्रारींसाठी पोर्टलचे अनावरण; एका क्लिकवर नोंदवता येणार तक्रार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती

    Iran war effect : पेट्रोल डिझेलचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा निर्वाळा; गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण सूचना!!