विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर जोशात आलेल्या महाविकास आघाडीच्या विधानसभा जागा वाटपाचा अजून पत्ता नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत राहणार की नाही??, काँग्रेस आणि शरद पवार उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत ठेवणार की नाही?? याची अजून कुणालाच भनक नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पक्ष खेचाखेची करण्याच्या भूमिकेत अजून कायम आहेत. Seat allocation of Mahavikas Aghadi
पण तिकडे लक्ष द्यायचे सोडून, रोहित पवारांना मात्र महायुतीतल्या जागा वाटपाची “आतली” बातमी हाती लागली आहे. किंबहुना त्यांनी तसा दावा तरी केला आहे. कारण त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर अजित पवारांना कोणी कशी किती ऑफर दिली आहे??, याची तपशीलवार मांडणी करून टाकली आहे.
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन
भाजपचा म्हणे अंतर्गत सर्वे आला. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीसारखाच परफॉर्मन्स दिसला. त्यामुळे भाजपने अजित पवारांना खूप कमी जागा ऑफर केल्याचा दावा रोहित पवार यांनी आकड्यानिशी केला. भाजपच्या अंतर्गत सर्वे मध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला फक्त 7 ते 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 17 ते 22 आणि भाजपला 60 ते 62 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्यामुळे भाजपने अजितदादांना खूप कमी जागांची ऑफर दिली आहे. त्या उलट शरद पवारांच्या सगळ्या बड्या नेत्यांना त्यांच्याच मतदारसंघात रोखण्याची जबाबदारी अजितदादांच्या गळ्यात टाकली आहे. ही जबाबदारी अजितदादांनी नीट पार पाडली, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 6 – 7 जागा “एक्स्ट्रा” द्यायला देखील भाजप तयार आहे, असा “जावईशोध” रोहित पवारांनी लावून तो आपल्या सोशल मीडिया हँडल्स वर शेअर केला आहे.
पण रोहित पवार ज्या महाविकास आघाडीत आहेत, त्याचे जागावाटप अद्याप का, कसे, कुठे रखडले आहे??, ते कुणी रखडवले आहे??, याबद्दल त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही.
Rohit Pawar said Seat allocation of Mahavikas Aghadi
महत्वाच्या बातम्या
- धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन
- Prakash Ambedkar : संभाजीराजे + जरांगे + बच्चू कडू यांची अद्याप नुसतीच बोलणी; प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकरांनी साधली तिसऱ्या आघाडीची संधी!!
- Imran Khan : पाकिस्तानात इम्रान खानचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले; 2 आठवड्यांचा अल्टिमेटम, सुटका न झाल्यास तुरुंगातून सोडवण्याचा इशारा
- Surat : सुरतच्या गणेश मंडळावर दगडफेक, 33 जणांना अटक; निषेधार्थ हजारो लोकांची निदर्शने; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या