• Download App
    Rohit Pawar मोदी - शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा; विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!

    मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा; विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!

    नाशिक : मोदी – शाहांना चुचकारा, भाजपच्या मित्रपक्षांना डिवचा आणि विलीनीकरण फसल्याच्या डावाचे वड्याचे तेल वांग्यावर काढा!!, असलाच प्रकार रोहित पवारांच्या आजच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतून समोर आला. Rohit Pawar

    – राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी

    रोहित पवारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाता संदर्भात नवी मागणी केली. व्ही एस आर कंपनीशी दिल्लीतल्या बड्या लोकांचे संबंध आहेत. हे बडे लोकच विमान अपघातात संदर्भातली चौकशी लांबवतायेत. त्याचा अहवाल येऊ देत नाहीयेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच अजित दादांना न्याय द्यावा सध्याचे हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा घेतल्याखेरीज अजित दादांच्या विमान अपघाताची चौकशी आणि तपास पुढे सरकणार नाही तो नीट होणार नाही. त्याचा अहवाल सुद्धा व्यवस्थित येणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला.



    – रोहित पवारांचा दुहेरी डाव

    रोहित पवारांनी राम मोहन नायडू यांच्या राजीनामाची मागणी करून दुहेरी डाव खेळला. एक तर त्यांनी भाजपचा मित्र पक्ष तेलगू देशम याला संशयाच्या घेऱ्यात आणले. त्या पक्षाच्या नेत्यांना डिवचले. भाजप आणि तेलुगू देशम यांच्यात पाचर मारायचा प्रयत्न केला. सध्या भाजपला विद्यमान मित्र पक्ष सोडून इतर पक्षांची गरज नाही त्यामुळे भाजप आणि तेलुगू देशम यांच्यात दुरावा निर्माण झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ खासदारांची भाजपला गरज लागू शकेल, असा यामागचा खरा “डाव” आहे. त्यातली पहिली खेळी म्हणून रोहित पवारांनी राम मोहन नायडू यांचा राजीनामा मागून त्यांना टार्गेट केले.

    – शरद पवारांचा हा जुनाच डाव

    पण त्याचवेळी त्यांनी मोदी आणि शाह यांना चुचकारले. पण असे करण्यात सुद्धा रोहित पवारांनी कुठला नवा डाव खेळला नाही हा शरद पवारांचा नेहमीचा “डाव” आहे. शरद पवार नेहमीच राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना पाण्यात पाहतात. आपले मोदी आणि शाह यांच्याशी थेट संबंध आहेत. आपण त्यांच्याकडून कामे करून घेतो, असे पवार नेहमीच भासवत असतात. रोहित पवारांनी सुद्धा त्याच पद्धतीचा “डाव” घेऊन मोदी आणि शाह यांना चुचकारले. मोदी आणि शाह हे दोनच नेते अजितदादांना न्याय देऊ शकतात, असे म्हटले.

    – गॅरेंटी नाही

    पण आता शरद पवारांच्या या “डावा” मागचे राजकारण सुद्धा फार पुढे निघून गेले आहे. भाजपचे केंद्रातले नेते आणि राज्यातले नेते पवारांचा “डाव” पुरता ओळखून आहेत. त्यामुळे रोहित पवारांच्या चुचकारण्याचा “डाव” सफल होईलच, याची कुठलीच गॅरेंटी नाही. उलट राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने तो उलटण्याचीच जास्त शक्यता आहे.

    Rohit Pawar playing double game like Sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर नाड्या काँग्रेस हायकमांडच्या हातात!!; राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, तर नाड्या भाजपच्या हातात!!

    AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!

    राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे सहा उमेदवार निवडून येणे पक्के; उरलेला एक उमेदवार महाविकास आघाडीने ठरवावा!; फडणवीसांनी मारली पाचर