• Download App
    Rohit Pawar Urges Nitin Gadkari to Name Pune Highways After Late Ajit Pawar VIDEOS पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

    Rohit Pawar : पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Rohit Pawar  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. बारामती विमानतळावर झालेला अपघात हा घातपात होता की अपघात? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सातत्याने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडत आहेत. तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांची भेट देखील घेतली आहे. आता त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी दोन महामार्गांना अजितदादांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.Rohit Pawar

    नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राबद्दल नेहमीच सकारात्मक विचार करणारे व महाराष्ट्राला व मराठी माणसाला न्याय देण्याची भूमिका ठेवणारे नेते म्हणजे आदरणीय गडकरी साहेब. गडकरी साहेबांचे आणि अजित दादांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘कामाचा माणूस’ हे या दोन्ही व्यक्तिमत्त्वामधील साम्य, असे पवार यांनी म्हटले.Rohit Pawar



    महामार्गांना अजितदादांचे नाव देण्याची मागणी

    पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, गडकरी साहेबांची आज दिल्लीत भेट घेऊन पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग यासह पुणे-शिरूर उन्नत महामार्गास स्व. अजित दादांचे नाव देण्याची विनंती केलील. एखाद्या विकास प्रकल्पाला किंवा वास्तूला नाव दिल्यानंतर दुसरे नाव देणे हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे संबंधित प्रकल्पाची उभारणी होत असतानाच त्यामागे मेहनत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नाव देणे हे अधिक योग्य ठरेल. गडकरी साहेबांनी यासाठी एक प्रक्रिया असल्याचे सांगत त्या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून पाठपुरावा करण्याचा शब्द दिला असल्याची माहिती पवारांनी दिली आहे.

    https://x.com/RRPSpeaks/status/2031667823752388840?s=20

    संसदेच्या अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताच्या पारदर्शक चौकशीसाठी खासदार सुप्रियाताईंच्या मदतीने आम्ही इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा करत आहोत. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष हे पारदर्शक चौकशीची मागणी करणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

    संसदेतही अजित पवारांच्या अपघातावर बोलू दिले नाही

    तसेच मराठी स्वाभिमान जपणाऱ्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत साहेबांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना बोलू दिले गेले नाही. हे पाहता, ज्याप्रमाणे राज्याच्या विधिमंडळात चर्चा होऊ दिली जात नाही त्याचप्रकारे संसदेत देखील चर्चेला कुठेतरी अडथळे आणले जात आहेत का? असा प्रश्न पडतो. असो कितीही अडथळे आणले तरी दोषींना कोणीही वाचवू शकणार नाही हे मात्र नक्की, असेही रोहित पवारांनी म्हटले आहे.

    Rohit Pawar Urges Nitin Gadkari to Name Pune Highways After Late Ajit Pawar VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    इस्लामला इतरांचे सहअस्तित्वच अमान्य; सहिष्णू समाजापुढे मुस्लिम प्रश्नाचे मोठे आव्हान!!

    Chhagan Bhujbal : परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा; नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला

    Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती चुकीची, मंत्री अदिती तटकरेंनी फेटाळला दावा