• Download App
    Rohit Pawar दिल्लीतल्या भेटीगाठींमागे रोहित पवारांचा वेगळाच "डाव"; सोनिया आणि खर्गेंना भेटून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी वशिला लाव!!

    दिल्लीतल्या भेटीगाठींमागे रोहित पवारांचा वेगळाच “डाव”; सोनिया आणि खर्गेंना भेटून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी वशिला लाव!!

    नाशिक : दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचा खोडा आहे तो निघता निघत नाही, हे लक्षात आल्यावर शरद पवारांच्या गटाने वेगळाच “डाव” टाकला. रोहित पवारांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी घेतलेल्या भेटीगाठींमधून तो समोर आला.

    रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघाताचा विषय घेऊन विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे आत्तापर्यंत वाटत होते. पण त्यांनी त्या भेटीगाठींचे फोटो शेअर करून तसे लिहिले देखील होते. पण रोहित पवारांच्या आजच्या भेटीगाठींवरून त्यांचा वेगळाच “डाव” असल्याचे समोर आले.

    – सोनिया गांधींशी भेट

    कारण रोहित पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबरच काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींची भेट घेतली. या भेटीचे फोटो रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डल वर शेअर केले. अजित पवारांच्या अपघाताचा विषय किती गंभीर आहे हे मल्लिकार्जुन खर्गे साहेबांनी सोनिया गांधींना समजून सांगितल्याचे रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवर लिहिले. पण त्या पलीकडे जाऊन सोनिया गांधींची आपली “सहज” भेट झाली असे भासविले. यावेळी त्यांच्या फोटोत सुप्रिया सुळे नव्हत्या. त्यामुळेच राजकीय संशयाची पाल चुकचुकली.

    – रोहित पवारांचा दिल्लीत पीआर

    एरवी रोहित पवार यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे किंवा काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचताच आले नसते. जिथे काँग्रेसचे हायकमांड शरद पवारांसारख्या ज्येष्ठतम नेत्याला सहजासहजी अपॉइंटमेंट देत नाही, तिथे रोहित पवारांसारख्या ज्युनिअर नेत्याला काँग्रेस हायकमांडने जुमानणे शक्यच नव्हते. अजित पवारांच्या अपघाताचा विषय घेऊन आल्याचे भासवले गेल्याने मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी यांनी रोहित पवारांसारख्या ज्युनिअर नेत्यांची भेट घेतली. या निमित्ताने रोहित पवारांचा दिल्लीतला पीआर जोरदार वाढला.

    – विलीनीकरणाचा दुसरा पर्याय

    आता दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होतच नाही. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजप यांनी खोडा घातलाच आहे तो निघता निघत नाही, तर मग दुसरा पर्याय काय??, तर काँग्रेसमध्ये विलीनीकरण हाच!! पण ते सुद्धा सहज होणार नाही कारण काँग्रेसचे नेते शरद पवारांसारख्या नेत्यांवर विश्वास ठेवू शकत नाहीत. अशा स्थितीत शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांनी अजित पवारांच्या अपघाताचा विषय घेऊन काँग्रेसच्या गोटामध्ये शिरकाव करायचा “डाव” खेळला. त्याचा पहिला टप्पा म्हणून रोहित पवारांनी वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, संजय सिंग वगैरे नेत्यांचा समावेश होता त्या पाठोपाठ रोहित पवारांनी पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंग या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा भेटी घेतल्या. मात्र या भेटीच्या वेळी सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर नव्हत्या. त्या फक्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीच्या वेळी बरोबर होत्या.

    – राजकीय रहस्य

    पण रोहित पवारांनी आज सगळ्यात महत्त्वाची भेट सोनिया गांधींची घेतली. या भेटीच्या फोटोमध्ये सुप्रिया सुळे कुठेच दिसल्या नाहीत. पण म्हणून त्या भेटीगाठींमागचे “राजकीय रहस्य” लपून राहिले नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही ना, मग सोडून द्या, त्याऐवजी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंना भेटून काँग्रेसमध्ये विलीनीकरणासाठी वशिला लावा!!, हेच ते “राजकीय रहस्य” होय!!

    Rohit Pawar Met Congress Leader in delhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वेद म्हणजे विज्ञानाधिष्ठित जीवनमार्ग; नागपूरात निरंजनभाई ठाकर वेद पाठशाळेचे उद्घाटन

    Nashik TCS Case : नाशिक TCS प्रकरणातील पीडिता म्हणाली- आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला

    Paratwada : परतवाडा प्रकरणात पोलिसांना मोठे यश:आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश; मोठा पर्दाफाश होणार?