विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून, रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे.Raj Thackeray
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आहेत. त्यांच्या स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा महाराष्ट्र सर्व काही बघतो आहे. महिलांचा आदर ठेवणे महत्त्वाचे आहे. दादांचे महाराष्ट्रावर, कार्यकर्त्यांवर आणि आमदारांवर प्रेम होते, पण 4 नेत्यांवर दादांचा वचक होता पण काल आम्ही पाहिल्यावर जयला कुठे जागा द्यायची हे नेता ठरवतो, कुणी सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणी ओढतो हे काय सुरू आहे, थोडे सांभाळून वागा असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.Raj Thackeray
तटकरे, पटेलांवर केली टीका
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाचे 4 लोकं आहेत त्यांनी काय केले त्यांनी फक्त विलीनीकरणाच्या विषयाला जिंवत ठेवण्याचे काम केले आहे, कारण त्या शिवाय त्यांचे अस्तित्व दिसून येत नाही.माझे या नेत्यांना सांगणे आहे की, तुम्ही राजकारण करा, आम्ही पण करू पण आता ही वेळ नाही. कुणाला वाटत असेल की अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हते पण सुनेत्रा पवारांना करता येईल तर तसे होणार नाही. हा तुमचा भ्रम आहे, त्यांची काय ताकद आहे हे लवकरच कळेल. त्यांच्या पक्षातील 4 नेत्यांनी सांभाळूल रहावे.
शरद पवारांनी स्टेंटमेंट वाचून दाखवले
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघातानंतर शरद पवार यांनी कॅमेराकडे बघून स्टेंटमेंट दिलेले नाही. त्यांना वाचावे लागले ते भावनिक झाले होते त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या त्या वाचल्या ही आमची परिस्थिती होती, यावर तुम्ही राजकारण करत आहात. दुसऱ्या दिवशी वातावरण पेटू नये दगडफेक होऊ नये यासाठी कुठेही अडचण होऊ नये म्हणून शरद पवारांनी स्टेंटमेंट वाचून दाखवले.
न्याय मिळवण्यासाठी राज ठाकरे मदत करणार
रोहित पवार म्हणाले की, राज ठाकरे मराठी माणसांसाठी आजपर्यंत लढत आलेले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा घेऊन मी त्यांची भेट घेतली. अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी सामान्य जनता, आमचा पक्ष प्रयत्न करत आहे, तुम्ही पण सुद्धा ताकद द्यावी, यावर त्यांनी अजित पवारांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
.. तर महाराष्ट्र सोडणार नाही
रोहित पवार म्हणाले की, FIR का घेतला पाहिजे तर तपास ज्या तपास यंत्रणेकडे दिला जातो त्यांना त्यांचा तपास करावाच लागतो. त्यामुळे FIR असणे गरजेचे आहे.जर तसे झाले नाही तर केवळ अपघाताचा तपास होईल, घातपात संदर्भात तपास होणारच नाही. म्हणून ही भूमिका आम्ही घेत आहोत. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की 1 महिन्यांच्या आत रिपोर्ट हाती आला पाहिजे. आज, उद्या येणारा रिपोर्ट थातूरमातूर देऊ नये तो योग्य असला पाहिजे, अन्यथा जनता तुम्हाला सोडणार नाही. मी सोमवारी या संदर्भात मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे.
FIR साठी तुम्ही मदत करावी
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांनी काल माझ्यावर टीका करताना म्हटले की मी केवळ इव्हेंट करत आहे. बर तसे तुम्ही समजा पण तुम्ही सत्तेत आहात ना? मग FIR सर्वांचा अधिकार आहे, मी विरोधात आहे म्हणून तु्म्ही तो FIR घेऊ देत नाही. तुम्ही सत्तेत आहात ना माझ्याबद्दल काय वाटायचे ते वाटू द्या पण तपास काय दिशेने जातो, ते बाजूला ठेवून FIR दाखल करण्यासाठी मदत करा. केवळ भाषणं करत नवे पर्व सुरू झाले म्हणत आहात पण अजित पर्व हे कधीच संपणार नाही.
5 ही जणांचा मृत्यू
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणात जे पायलेट ते विमान चालवत होते ते जिंवत आहे असे समजून चालणार नाही. ज्यांची आधी नियुक्ती झाली ते कॅन्सल झाली ते पायलट जिंवत आहेत. त्या विमानामध्ये 5 जण होते त्यातील एकही व्यक्ती जिंवत नाही. हा अपघात होता की घातपात याची हे समजणे गरजेचे आहे. FIR देणं आमचा अधिकार आहे आणि तो दाखल करुण घेणं ही त्यांची ड्युटी आहे. तो दाखल केला का जात नाही? असा सवाल पुन्हा एकदा रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या अपघाताबद्दलच्या सर्व घटना समजून घेतल्या. मी जी माहिती करुण घेऊन गेलो होतो ती पूर्ण माहिती त्यांनी समजून घेतली. त्यानंतर बोलत असताना त्यांनी सांगितले की महत्त्वाचा विषय हा आहे की पोलिसांनी FIR का घेतला नाही. त्यांनी मला सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले ज्यामध्ये एफआयआर घ्यावाच लागतो हे स्पष्ट होत आहे. मी एकच प्रश्न केला की मोठ्या नेत्यांचा दुर्दैवी मृत्यू होत असेल आणि FIR होत नसेल तर त्यासाठी काय करायचे ते आम्ही करू. मला विश्वास आहे की, अजितदादांना न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात राज ठाकरे साहेब हे पूर्ण ताकदीनिशी आमच्या पाठीशी उभं राहतील. आता विधिमंडळात जाऊन मी काही लोकांशी चर्चा करणार आहे. काल अमित ठाकरे यांना मी विनंती केली होती की मला राज ठाकरे यांना भेटायचे आहे. अजित पवार यांच्या घातपाताबाबत चर्चा करायची आहे काही माहिती द्यायची आहे म्हणताच त्यांन मला भेटीची वेळ दिली.
Rohit Pawar Meets Raj Thackeray Over Ajit Pawar Crash Probe VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- WhatsApp : 1 मार्चपासून सिम कार्डशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही; सरकारचा मुदतवाढ देण्यास नकार
- दोन राष्ट्रवादींच्या घामासानात सगळ्याच पवारांचा एकछत्री अंमल धोक्यात!!
- महायुती सरकारवर सतत टीका करणाऱ्या भालचंद्र नेमाडे यांचा सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे सन्मान; साहित्य भूषण पुरस्कार प्रदान
- राज्यसभेच्या स्वतःच्या जागेसाठी शरद पवार पुन्हा उद्धवसेनाच पोखरायच्या बेतात!!