प्रतिनिधी
पुणे : एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ट्विटर उपदेशाचे डोस पाजणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना आता खुलासा देणारी धावपळ करावी लागत आहे. 2024 नंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात ते “बदल” करायला गेले आणि खुलाशाची धावपळ करण्याची वेळ त्यांच्यावर आली. Rohit Pawar had to explain his stance over leadership of NCP after 2024
जुन्नर मध्ये आमदार अतुल बेनके यांच्या एका कार्यक्रमात आपण भविष्यवेधी राजकारणाचा वेध घेत असल्याचे सांगत रोहित पवारांनी 2024 नंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वात “बदल” होण्याचे भाकीत केले. 2024 नंतर राष्ट्रवादीत तरुणच सर्व निर्णय घेतील. कारण देशाच्या राजकारणामध्ये फार मोठे बदल होणार आहेत त्यावेळी आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठी तरुणांना पुढे यावे लागेल. त्यासाठी शरद पवारांनी अजित पवारांचे मार्गदर्शन असेल. पण निर्णय मात्र तरुण नेते घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले.
रोहित पवारांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जाऊ लागले. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीतल्या नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा सुरू झाली. शरद पवार आणि अजित पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेले तर नेतृत्व कोणाकडे सुप्रिया सुळे यांच्याकडे? की थेट रोहित पवार यांच्याकडे?, यावर सोशल मीडियात खल सुरू झाला. वेगवेगळ्या राजकीय तर्कवितरकांना उधाण आले आणि या चर्चेमुळेच रोहित पवारांना आपल्याच वक्तव्याचा खुलासा करण्याची वेळ आहे.
रोहित पवारांचा तो खुलासा अर्थातच नेहमीच आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मला असे म्हणायचे नव्हते. 2024 नंतर तरुणांनी राजकारणात पुढे यावे, असे मला म्हणायचे होते, असा खुलासा रोहित पवार यांनी केला. पण रोहित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेतृत्वावरून कशा प्रकारचा संघर्ष होऊ शकतो याची एक वेगळी चणूकच पाहायला मिळाली.
Rohit Pawar had to explain his stance over leadership of NCP after 2024
महत्वाच्या बातम्या
- एका माणसासाठी उद्धव ठाकरेंनी अख्खी शिवसेना पणाला लावली, पण…; कृपाल तुमानेंचा टोला
- आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादात वाद; संभाजीनगर दौऱ्यात कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची!!
- हर घर जल : बुरहानपूर ठरला देशातील पहिला जिल्हा, जिथे 100% घरांपर्यंत पोहोचले पाणी; PM मोदींनी केले अभिनंदन
- खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगाचा 8 ऑगस्टला फैसला अपेक्षित!!
- आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा : शिवसैनिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील, गद्दारांना नव्हे, युवा सेनेचे 280 कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल