विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत आजोबांच्या पावलावर नातवाने पाऊल टाकले. मोठा गाजावाजा आणि इव्हेंट करत रोहित पवार ED चौकशीसाठी त्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या बारामती ॲग्रो कंपनीत मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या आरोपाची सक्तवसुली संचालनालय अर्थात ED चौकशी करीत आहे.
ED चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रोहित पवारांनी आज मोठा इव्हेंट केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ते पोहोचले त्यावेळी शरद पवारांनी त्यांना आशीर्वाद दिले आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक भेट दिले यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या हॉटेल ट्रायडेंट मधून रोहित पवार विधिमंडळात गेले तेथे थोर पुरुषांच्या प्रतिमांना त्यांनी वंदन केले आणि त्यानंतर ते राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले तेथे शरद पवारांच्या आशीर्वाद घेतले आणि सुप्रिया सुळे यांच्या समावेत ते ED कार्यालयात दाखल झाले.
या सगळ्या इव्हेंट दरम्यान रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालवल्या परंतु प्रत्यक्षात फक्त बारामती आणि जामखेड या मतदारसंघांमधून ते कार्यकर्ते आल्याचे या बातम्यांमध्ये खाली नमूद केले. रोहित पवारांच्या समर्थकांनी “पळणारा नव्हे, लढणारा दादा”, अशी त्यांची पोस्टर्स झळकवली.
राज्य सहकारी शिखर बँक घोटाळे संदर्भात शरद पवारांना देखील अशीच ED नोटीस आल्याची अफवा त्यांच्या समर्थकांनी पसरवली होती. त्यावेळी देखील पवारांनी आपण स्वतःच चौकशीला सामोरे जाऊ, असा आवाहनच मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु त्यावेळी फडणवीस सरकारने थोडे नमते घेत पवारांना मूळातच ED ने नोटीस काढलेली नाही. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे कारण नाही, असे सांगायला त्या वेळचे पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांना पवारांच्या घरी पाठवले होते. सदानंद दाते यांनी विनंती केल्यानंतर पवार घरातच थांबले होते. परंतु त्यावेळी पवारांनी ED चौकशीचा मोठा इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला होता. तसाच इव्हेंट रोहित पवारांनी आज केला. परंतु त्यांना प्रत्यक्षात ED चौकशीसाठी कार्यालयात दाखल व्हावे लागले आहे.
शरद पवार 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. त्यांचे नातू आमदार रोहित पवार 38 व्या वर्षी त्यांच्या बारामती ॲग्रो कंपनीतील घोटाळ्याबद्दल ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. यावेळी त्यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे यादेखील आहेत.
Rohit Pawar ED Filed for inquiry
महत्वाच्या बातम्या
- कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर; केंद्राची घोषणा; दोन वेळा राहिले बिहारचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्र अवयवदानात देशात अग्रेसर; शेकडो रुग्णांना जीवदान
- राम मंदिराचे मुख्यमंत्री योगी यांनी केले हवाई निरीक्षण
- मीरा रोडच्या नया नगरमध्ये बुलडोझरची धडक कारवाई, दंगलखोरांची बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त!!