• Download App
    Rohit Pawar Demands Aviation Minister's Resignation Over Ajit Pawar Crash अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात, रोहित पवारांनी केली उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    Rohit Pawar : अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात, रोहित पवारांनी केली उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Rohit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.Rohit Pawar

    तेदेपा व व्हीएसआरचे खूप घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत. याच पक्षाचा खासदार केंद्रात उड्डयणमंत्री असल्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी पारदर्शक होणार नाही. हा मंत्री डीजीसीएच्या माध्यमातूुन कागपत्रांत हेराफेरी करू शकतो. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे ते म्हणालेत. व्हीएसआर कंपनीला अनेक पॉवरफूल लोकांचा पाठिंबा असल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे, अशी मागणीही रोहित पवार यांनी यावेळी केली.Rohit Pawar



    व्हीएसआर कंपनी व तेदेपाचे साटेलोटे

    रोहित पवार म्हणाले, भारताचे उड्डयण मंत्री तेदेपाचे आहेत. त्या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबातील एका सदस्याची एक वित्तीय संस्था आहे. या वित्तीय संस्थेने व्हीएसआर कंपनीत गुंतवणूक केली आहे. तुमच्याच घरचे लोकं व्हीएसआरला पैसे लावत असतील, रोहित सिंह (व्हीएसआरचा संचालक) च्या लग्नाला जात असाल. तुमचे त्यांच्याशी आर्थिक संबंध असतील, तर मग या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होईल? तेदेपाशी संबंधित असणाऱ्या एका उद्योगपतीचेही विमान व्हीएसआरकडे आहे. भारतातील सर्वात लेटेस्ट विमानाचाही संबंध या कंपनीशी आहे.

    तेदेपा व व्हीएसआरचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. याच पक्षाचा एक खासदार देशाचा उड्डयण मंत्री आहे. त्याच्या नेतृत्वात अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी कशी पारदर्शक होईल असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तेदेपाच्या उड्डयण मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी आपल्या पक्षाचे व्हीएसआर कंपनीशी असणारे संबंध लपवून ठेवले. ते डीजीसीएच्या माध्यमातून या प्रकरणाच्या तपासात मॅन्युप्युलेशन करू शकतात. कागदपत्रांची हेराफेरू करू शकतात. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची गरज आहे.

    व्हीएसआर कंपनीत महाराष्ट्रातीलही काही लोकांचा समावेश आहे. हे लोक खूप पॉवरफूल आहेत. त्यामुळेच आम्ही या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी करत आहोत, असे ते म्हणाले.

    व्हीएसआर कंपनीला डीजीसीएचे रेड कार्पेट

    रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघातानंतरही व्हीएसआर कंपनीचा धंदा चांगला सुरू आहे. त्यांची विमाने कोण वापरत आहे, कशासाठी वापरत आहेत हे मी सांगू शकत नाही. या कंपनीला भीती वाटत नाही, कारण तिच्या मागे खूप मोठ्या लोकांची ताकद आहे. या कंपनीला डीजीसीएकडून रेड कार्पेट मिळाले आहे.

    विमानाच्या विम्याचाही एक अँगल

    रोहित पवार म्हणाले, या प्रकरणी विम्याचाही एक अँगल आहे. सदर विमान गुजरातच्या एका उद्योगपतीने विकत घेतले होते. त्यांनी हे विमान व्हीएसआरला 35 कोटींना विकले. हे विमान चालवणाऱ्या वैमानिकाला 4 ते 5 वर्षे नोकरी नव्हती. ते जेट एअरवेजमध्ये नोकरीला होते, तेव्हा त्यांना दरमहा 10-12 लाख रुपये पगार होता. नंतर नोकरी गेल्यानंतर त्यांनी व्हीएसआर जॉईन केली. तिथे त्यांना दरमहा 3-4 लाख पगार मिळत होता. त्यामुळे ते आर्थिक अडचणीत होते. दबावात होते. त्यामुळे त्यांना विमानच्या लायबिलिटीजची माहिती होती का? हे आपल्याला पाहावे लागेल.

    या कंपनीच्या संचलनासाठी व्ही के सिंह नामक अकाउंटेबल मॅनेजर आहेत. त्यांना अजून का अटक झाली नाही. त्यांची चौकशी का झाली नाही. हा व्यक्ती खूप पोहोचलेला आहे. त्यामुळे आमचा त्याच्यावर संशय आहे. या प्रकरणी सेफ्टी ऑफिसरही संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. या प्रकरणी डायरेक्टर ऑफ ट्रेनी हा अधिकारीही संशयास्पद आहे, असे रोहित पवार म्हणाले.

    ब्लॅकबॉक्स जळाल्याचे दावे पूर्णतः फेक

    रोहित पवार म्हणाले, ब्लॅकबॉक्स जळाल्याचे दावे पूर्णतः फेक आहेत. या दुर्घटनेत कॉपरचे वायरही फारसे जळाले नाहीत. मग ब्लॅकबॉक्स कसा जळेल? या प्रकरणी पुराव्याशी छेडछाड केली जात आहे असा आमचा आरोप आहे. या प्रकरणी उड्डयण मंत्र्यांवरही आमचे आक्षेप आहेत. ते या प्रकरणाच्या तपासापासून दूर राहिले पाहिजेत.

    डीजीसीएच्या श्वेता सिंह नामक अधिकाऱ्यावर आक्षेप

    डीजीसीएच्या स्पेशल ऑडिटमध्ये कॅप्टन अपूर्व अग्रवाल व लोकेश रामपाल आहेत, त्यांना लेअरजेटविषयी काहीच माहिती नाही. वरील अधिकाऱ्यांनाही याची माहिती नाही. आमचा पहिला आक्षेप आहे की, डीजीसीएचे मोठे अधिकारी व्हीएसआरला मदत करत आहेत. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांचाच यात हात असेल तर चोरच पोलिसांची चौकशी करत आहेत असे या प्रकरणी चित्र आहे. ज्या लोकांना लेअरजेटची माहितीच नाही, त्यांची निवड का करण्यात आली? हा रिपोर्ट 15 तारखेला येणार होता. पण तो अजून आला नाही. मग ही बॉडी काय करत आहे असा आमचा प्रश्न आहे.

    अपूर्व अग्रवाल हा जेट एअरवेजचा माजी अधिकारी आहे. आम्ही वैयक्तिक गोष्टींत जात नाही. पण त्यांचे डीजीसीएतील श्वेता सिंह नामक एका महिला अधिकाऱ्याशी चांगले संबंध आहेत. ही अधिकारीही जेट एअरवेजची माजी अधिकारी आहे. आम्ही श्वेता सिंह यांच्याविषयी पुढे माहिती देऊ. पण हीच अधिकारी व्हीएसआरच्या विमानांच्या ऑडिटला जबाबदार आहे.

    विमान अपघात पूर्वनियोजित होता का?

    रोहित पवार म्हणाले, अजित पवार विमानात जिथे बसले होते, त्याच्या मागे टॉयलेट सेक्शन होते. तिथे बॅगा ठेवल्या जातात. त्या जागी त्या दिवशी पेट्रोलचे अतिरिक्त कॅन ठेवण्यात आले होते. त्यामुळेच विमान पेटले होते असा आमचा आरोप आहे. या गोष्टींचा तपास करण्याची गरज आहे. तसेच या विमानात अनावश्यक पेट्रोल जास्त होते. हे पेट्रोल विमानात ठेवण्याची काहीच गरज नव्हती. हे पेट्रोल त्यांना हैदराबाद किंवा ते ज्या ठिकाणी जाणार होते तिथेही भरता आले असते. विमान मुंबईहून निघाले होते तेव्हाच त्यांनी एवढे पेट्रोल का भरले? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे हा अपघात पूर्वनियोजित होता का? असा संशय आहे.

    पायटला कुणीतरी ब्लॅकमेल करत होते काय?

    रोहित पवार यावेळी सादरीकरण करताना म्हणाले, आजच्या सादरीकरणात यापूर्वीच्या पत्रकार परिषदेहून वेगळी माहिती आहे. अजित पवारांच्या अपघातावेळी विमानाचा एकच स्फोट झाला नव्हता. अनेक स्फोट झाले होते. या प्रकरणी वैमानिकावर दबाव टाकला असेल किंवा त्याला ब्लॅकमेल करून ही घटना घडवली असेल. अहमदाबाद विमान अपघातावेळी बाह्य तपास यंत्रणांनी पायलटकडे बोट दाखवले होते. या प्रकरणी विश्लेषण केले आहे. व्हीएसआर कंपनीच्या संचलनात अनेक दोष आहेत. त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. तसेच या मागे कुणीतरी असण्याचीही शक्यता आहे.

    नागरी उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्या घ्या – रोहित पवार

    रोहित पवार म्हणाले, या प्रकरणी कटकारस्थानाचा विचार केला. तर या प्रकरणी दोन प्रकारचे षडयंत्र आहे. एक राजकीय व दोन कमर्शियल. यापैकी एकाचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. विमान अपघाताला व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे त्या कंपनीला कुणी पाठिशी घालत असेल, तिला वाचवत असेल तर ते ही एक षडयंत्र असू शकते. या कंपनीच्या मागे खूप शक्तिशाली लोक आहेत. डीजीसीएचे अधिकारी यामागे आहेत. त्यामुळे आपल्याला अजित पवारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर महाराष्ट्राचे लोक, या देशातील जनता या प्रकरणी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांचा आवाज इथपर्यंत पोहोचत आहेत.

    या प्रकरणी न्याय करायचा असेल तर या देशातील सर्वात पॉवरफूल लोकांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात. कारण, या प्रकरणात हात असणारे खूप शक्तिशाली आहेत. त्यामुळे देशातील सर्वात ताकदवान असणाऱ्या या दोन नेत्यांनीच (मोदी-शहा) या प्रकरणाच्या तपासात लक्ष घालण्याची गरज आहे.

    मी आज या प्रकरणी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवणार आहे. कारण, मला त्यांच्या भेटीची वेळ मिळेल किंवा नाही हे माहिती नाही. पण आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या नागरी उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मोदी व शहांकडे आम्ही ही मागणी करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही हा विषय आपल्या हातात घेण्याची विनंती करत आहोत. या प्रकरणी तेदेपाच्या उड्डयण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

    Rohit Pawar Demands Aviation Minister’s Resignation Over Ajit Pawar Crash

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण- फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, धनंजय देशमुख यांचा दावा

    पिंपरी-चिंचवडमध्ये “अजित सृष्टी”उभारणीला महापालिकेची मंजुरी; भाजप आमदार महेश लांडगेंचा पुढाकार

    आजोबांचा नातवाकरवी सुनेकडे राज्यसभेसाठी वशिला!!