Sunday, 11 May 2025
  • Download App
    पवारांच्या घरातच 3 खासदार, 2 आमदार तरी ही "लोकशाही"च, घराणेशाही नव्हे; रोहित पवारांचे अजब तर्कट!! Rohit pawar claims that this not pawar dynasty

    पवारांच्या घरातच 3 खासदार, 2 आमदार तरी ही “लोकशाही”च, घराणेशाही नव्हे; रोहित पवारांचे अजब तर्कट!!

    Rohit pawar claims that this not pawar dynasty

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही आहे त्या हुकूमशाहीला तडाखा देण्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र आल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पवारांच्या घरातच 3 खासदार आणि 2 आमदार आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शरद पवारांची हीच का ती “लोकशाही”??, असा भडीमार सोशल मीडियातून होतो आहे. त्यावर रोहित पवारांनी अजब तर्कट देत पवारांची ही घराणेशाही नसल्याचा दावा केला आहे. Rohit pawar claims that this not pawar dynasty



    शरद पवार आणि अजित पवारांची घरे आता वेगळी झाली आहेत. त्यामुळे पवारांच्या घरात 3 खासदार आणि 2 आमदार असले, तरी तिला घराणेशाही म्हणता येणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला. आपले अजब तर्कट पुढे वाढविताना रोहित पवार म्हणाले, शरद पवारांनी सत्तेवर असताना कधीही सुप्रिया सुळे यांना खासदार केले नाही. त्यांनी प्रफुल्ल पाटील यांना केंद्रीय मंत्री पदाची संधी दिली, पण अजित पवारांनी मात्र राज्यसभा खासदारकीची संधी घरातच दिली, पण आता शरद पवार आणि अजित पवारांची घरे वेगळे आहेत त्यामुळे याला घराणेशाही म्हणता येणार नाही, असे अजब तर्कट रोहित पवारांनी लढविले.

    वास्तविक पाहता शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना 2006 मध्येच राज्यसभेत खासदार केले होते. त्यावेळी शरद पवार केंद्रात कृषिमंत्री होते. मात्र रोहित पवारांनी बिनधास्त ठोकून देत सुप्रिया सुळे यांना पवारांनी सत्तेवर असताना खासदार केले नसल्याचा दावा केला. अजित पवारांचा आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर विश्वास नसल्याने त्यांनी सुनेत्रा पवारांना राज्यसभा खासदारकीची संधी दिली, असे टीकास्त्र रोहित पवारांनी त्यांच्यावर सोडले.

    विधिमंडळाचे अधिवेशन होऊन जाऊ द्यात. आमदारांना निधी मिळू द्यात, मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आमच्याकडे येतील. जे आमदार आमच्या विरोधात बोलले नसतील त्यांना आम्ही पक्षात घेऊ, असा दावाही रोहित पवारांनी केला.

    Rohit pawar claims that this not pawar dynasty

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ