• Download App
    Rohit Pawar’ रोहित पवारांचा दावा- फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला

    Rohit Pawar’ : रोहित पवारांचा दावा- फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला

    Rohit Pawar’

    विशेष प्रतिनिधी

    धाराशिव : Rohit Pawar’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकारण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 80 ते 90 कोटी रुपये कॅश आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे,” असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, धाराशिवमधील सभेत त्यांनी खोटी शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे.Rohit Pawar’

    ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन बाजार’

    धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “खासदार असेच गोडीत फुटलेले नाहीत. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 60 ते 90 कोटी रुपये कॅश आणि दरवर्षी अडीचशे कोटींचा विकास निधी प्रत्येक खासदाराला दिला जाणार आहे. या विकास निधीतून 15 ते 20 टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरकडून घेतली जाईल आणि त्यातून तो निधी मिळणार आहे. हे सर्व नेते फक्त पैशासाठी गेले आहेत. हे कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ नसून डी-लिमिटेशनसाठी भाजपने मांडलेला हा ‘ऑपरेशन बाजार’ आहे.”Rohit Pawar’



    भाजपमधील अंतर्गत कलहावर रोहित पवार म्हणाले, “राज्यातील आणि केंद्रातील भाजपमध्ये सध्या वाद सुरू आहे. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदे यांना बळ देत आहे, तर राज्यातील भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताकद देत आहे. यामुळेच फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची अडवणूक करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हे खासदार फुटले असावेत,” असा दावाही त्यांनी केला. “भाजपला अजून 40 खासदारांची गरज आहे, पण ते मिळतील असे वाटत नाही. 2029च्या लोकसभेला आपण निवडून येणार नाही, हे माहीत असल्याने खासदार फोडून डी-लिमिटेशन करण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

    ‘ऑपरेशन तुतारी’ची हवा; पण एकही आमदार-खासदार फुटणार नाही!

    शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरनंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’ राबवले जाणार असून शरद पवार गटाचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर ठामपणे उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातून आमचा कोणताही आमदार किंवा खासदार फुटणार नाही. ही केवळ चर्चा आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Rebel MPs Got ₹90 Crore Cash, ₹250 Crore Funds: Rohit Pawar’s Big Claim

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Devendra Fadnavis : धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही, कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

    नागपूर मेट्रो टप्पा – 2 चा विस्तार आणि मुंबईच्या सावरकर सागरी सेतू – वांद्रे किल्ला कनेक्टरला फडणवीस सरकारची मान्यता!!

    Narayan Rane : खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा; भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?