प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवादाची वाढ झाली, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोनदा केला आहे. पहिला आरोप त्यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत केला होता. या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केला आहे.Rohit Pawar claimed, NCP became most popular party immediately after its formation
या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवारांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लोकांनी तो पक्ष डोक्यावर घेतला.
डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणण्यासाठी त्या वेळच्या विरोधी पक्षांनी जातीयवाद आणल्याखेरीच या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला खाली खेचत येणार नाही हे ओळखून महाराष्ट्रात जातीयवाद आणला म्हणून त्याचा थोडाफार फटका राष्ट्रवादीला बसू शकला.
दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, की राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. त्यांनी लोकसभा निवडणुकीत “लाव रे तो व्हिडिओ” अशी वक्तव्ये करून महाराष्ट्रात प्रचाराची धूळ उडवून दिली होती. ती धूळ भाजपच्या अनेक नेत्यांचे अनेक नेत्यांच्या डोळ्यात गेली आहे. ती अजून चुरचुरत आहे. त्यामुळे भाजपचे बडे – बडे नेते डोळे चोळत आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवादाला याचा मात्र रोहित पवार यांनी इन्कार केला.