नाशिक : अजितदादांच्या अपघाताविषयी संभ्रम आणि संशयाच्या जाळ्यात; रोहित पवार आणि सुप्रिया सुळे राजकीय तोट्यात!!, हेच राजकीय चित्र आता कायमचे टिकून राहण्याची शक्यता आहे. कारण ज्या प्रकारे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवार वेगवेगळ्या पद्धतीने संभ्रम आणि संशय निर्माण करू पाहत आहेत, ते लक्षात घेता ते दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात तर खोडा घालतच आहेत, पण त्या पलीकडे जाऊन ते स्वतःचे आणि सुप्रिया सुळे यांचे राजकीय भवितव्य सुद्धा धोक्यात आणत आहेत, ही राजकीय वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. Rohit Pawar and Supriya sule
विलीनीकरणाचा डाव पवार हरले
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांनी टाकलेला पहिला डाव विलीनीकरणाचा होता, पण तो केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह उधळून लावला. त्यामध्ये सुनेत्रा पवार सुद्धा अग्रभागी होत्या. फक्त यापैकी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वगळता बाकी कुणीही काहीही बोलले नाही. त्यांनी फक्त “राजकीय कृती” केली. पण त्यामुळे शरद पवार आणि त्यांचे चेले विलीनीकरणाचा पहिला डाव तरी हरले. म्हणूनच त्यांनी सुरुवातीला आदळ आपट करून पाहिली, पण ती सुद्धा फोल ठरली म्हणून मग रोहित पवारांनी विलीनीकरणाचा विषय नाईलाजाने बासनात गुंडाळून ठेवला. त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदा रद्द करून टाकल्या, पण अजित पवारांच्या विमान अपघाताविषयीची संशय पेरणी मात्र अधिक दाट केली. विलीनीकरण हातातले निसटून गेले हे पाहताच त्यांनी आहेत पवारांच्या विमान अपघाताच्या विषयाला “प्राधान्य” दिले. किंबहुना त्यांना ते द्यावे लागले, म्हणूनच त्यांनी खाजगी गुप्तहेर तपास संस्थांच्या आधाराने स्वयंघोषित तपास चालविला.
फक्त राजकीय वातावरण निर्मिती
पण या सगळ्यामुळे रोहित पवारांची राजकीय अवस्था संजय राऊत यांच्यापेक्षा वेगळी राहिली नाही. त्यांच्या खाजगी गुप्तहेर तपास संस्थांच्या तपासाची माहिती आणि निष्कर्ष काहीही आला, तरी तो केंद्रीय सरकारी तपास यंत्रणा आणि राज्यातल्या सरकारी तपास यंत्रणा मानायची सुतराम शक्यता नाही. फार रोहित पवारांच्या खाजगी गुप्तहेर तपास संस्थांच्या तपासाच्या बातम्या मराठी माध्यमे चालवतील. त्यातून राज्यात विशिष्ट वातावरण निर्मिती करत राहतील. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सत्ताधारी राजकारणावर होण्याची शक्यता नाही.
उलट महाराष्ट्रातील सत्ताधारी घटक अधिक सजग होतील. अधिक आक्रमक राजकीय कृती करतील आणि त्याचा मोठा तोटा रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना सहन करावा लागेल.
उचापती आणि उपद्रव
एक वेळ महाराष्ट्रातले सत्ताधारी घटक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या इतर नेत्यांना वेगवेगळ्या पद्धतीने सत्ताधारी घटकाशी जोडून घेतील. त्यांना सत्तेचे थोडेफार लाभ देतील, पण रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मात्र त्या सत्तेच्या लाभांपासून वंचितच ठेवतील. ज्या सत्तेच्या राजकारणासाठी रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि अगदी शरद पवारांना दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हवे होते, ते कारण तर साध्य होणार नाहीच. उलट इतरांना सत्तेचे लाभ देऊन रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मात्र सत्तेच्या लाभापासून कायमचे वंचित ठेवले जाईल. हे सगळे रोहित पवारांच्या राजकीय उचापतींमुळे आणि सुप्रिया सुळे यांच्या उपदेशी – उपद्रवी पत्रकार परिषदांमुळे घडेल. यापेक्षा उचापती आणि उपद्रवी राजकारणाचे दुसरे कुठलेही परिणाम घडून येण्याची शक्यता नाही.
Rohit Pawar and Supriya sule will pay the price of their mischievous politics
महत्वाच्या बातम्या
- बंजारा समाजातील मान्यवरांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन गौरव
- महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर; तर पाणी फेरणार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर!!
- PM Modi : मोदी म्हणाले- हे बजेट मजबुरी नाही, ‘आम्ही तयार आहोत’वाला क्षण; 38 देशांशी FTA वर चर्चा सुरू
- शंकर अण्णा धोंडगेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मराठवाड्यात पक्षाला बळकटी