विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे आणि शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते एकाच भाषेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे नवीन नाही. जरागेंच्या आंदोलनाची स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम मार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर खवळलेल्या जरांगेंची आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची भाषा देखील आज एकच झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध जाऊन भाजपच्या मराठा आमदारांमध्ये फूट पडावी, अशी अपेक्षा दोघांच्या तोंडी व्यक्त झाली. Rohit pawar and manoj jarange speak same language in targeting devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांना मी बोललो, तर मराठा आमदारांनी रागवायचे कारण काय?? त्यांना मराठा समाजाने निवडून दिले. त्यांना आमदारांनी मंत्री केले म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जवळ केले. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांना बोललो. बाकीच्यांना नाही. तर बाकीच्या मराठा आमदारांना राग यायचे कारणच काय??, असा सवाल मनोज जरांगे यांनी संभाजीनगर मधून केला.
देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांनी अंतरवाली सराटीतला आंदोलनाचा मंडप काढून टाकण्याचे आदेश पोलिसांना दिले, पण पोलिसांनी फडणवीस यांचे आदेश ऐकू नयेत. मराठा समाजाचा रोष ओढवून घेऊ नये. फडणवीसांना सुट्टी नाही, असे धमकी भरले वक्तव्य मनोज जरांगे यांनी संभाजीनगर मधून केले.
रोहित पवारांचा देखील तसाच रोख राहिला मनोज जरांगे यांनी आपल्याला टार्गेट केल्यावर फडणवीस आपल्याच पक्षातल्या मराठा आमदारांवर रागावले होते त्यामुळे त्यांच्या पक्षातले मराठा आमदार त्यांच्याभोवती एकवटले आणि ते जरांगेंवर बरसले, असा आरोप रोहित पवारांनी केला. रोहित पवार आणि मनोज जरांगे यांच्या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठा आमदारांनी जावे असाच सूर उमटला. सगळ्या आमदारांमध्ये मराठा – मराठेतर अशी जातीय फूट पडावी, हाच त्यांचा प्रयत्न दिसला.
Rohit pawar and manoj jarange speak same language in targeting devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या
- मुंबईत कुर्ला येथे प्रकल्पबाधितांना 961 घरांचे मुखमंत्र्यांच्या हस्ते वाटप!!
- CAA मार्चमध्ये लागू होणार? ; लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा घेणार निर्णय!
- EDने केजरीवालांना पाठवले आठवे समन्स, ‘या’ दिवशी चौकशीसाठी बोलावले
- शिवराळ भाषा जरांगेंची, पण पवारांचा फडणवीसांवरच असभ्यतेचा आरोप; अप्रत्यक्षपणे घेतली जरांगेंची बाजू!