• Download App
    Ajit Pawar Death: Rohit Pawar Alleges Conspiracy; Questions Pilot & VSR Aviation अजितदादांचा घातपात झाला- रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त

    Rohit Pawar : अजितदादांचा घातपात झाला- रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त

    Rohit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Rohit Pawar अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने ते कायम आपल्या सोबत आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या अपघाताबतचे सविस्तर प्रेसेंटेशन रोहित पवार यांनी सादर केले.Rohit Pawar

    दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारेल, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र, आज अजित दादा आपल्यात नाही. आम्ही प्रयत्न करून आम्हाला ही सर्व माहिती मिळाली आहे. मग सरकारच्या एजन्सीने जर काम केलं, तर या अपघाताचे रहस्य लवकरात लवकर आपल्याला कळेल, असे म्हणत रोहित पवार यांनी अजितदादांचा घातपात झाल्याचा आरोप केला. तसेच VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त केला.Rohit Pawar



    लोकांना सत्य कळावे, म्हणून पत्रकार परिषद

    रोहित पवार यांनी अफवांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना एक प्रसंग सांगितला. पिंपरी चिंचवडमध्ये सिग्नलला थांबले असताना एका रिक्षाचालकाने त्यांना विचारले की, 9 तारखेला तुम्ही अजितदादांबाबत काही सांगणार होता, त्याचं काय झालं? त्यावर रोहित पवार यांनी त्याला 10 तारखेला सर्व सांगणार असल्याचे उत्तर दिले. काही लोकांनी भावनिक होऊन दादा परत येतील असे व्हिडिओ टाकले, काहींनी विमानात सहा जण होते आणि दादांचे पार्थिव सापडले नाही असे सांगितले. या सर्व चर्चांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळेच लोकांना सत्य कळावे, म्हणून ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

    दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत

    या प्रसंगी रोहित पवार अत्यंत भावुक झाले. त्यांनी सांगितले की अपघातानंतर सलग सहा दिवस त्यांना हे सर्व एखाद्या वाईट स्वप्नासारखे वाटत होते. दादांचा अपघात झालाच नाही असे त्यांना सतत वाटत होते. मात्र, जेव्हा त्यांनी अपघातानंतर मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या, तेव्हा वास्तव समोर आले. जळालेला स्वेटर, चप्पल आणि अजितदादांच्या हातातील घड्याळ त्यांनी पाहिले. दादा नेहमी घड्याळ 15 मिनिटे पुढे ठेवत असत. त्या घड्याळात 9 वाजलेले होते आणि ते पूर्णपणे बंद पडले होते. ते दृश्य पाहून त्यांना खात्री पटली की अजितदादा आता हयात नाहीत.

    लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे

    रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांच्या प्रेमापोटी त्यांनी या अपघाताबाबत शक्य ती माहिती गोळा केली. काही जण विचारतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली, परंतु दादांबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळेच हा प्रयत्न केला. आम्ही सत्तेत नसतानाही जे जमेल ते करण्याचा प्रयत्न केला. दादा आणि साहेबांनी नेहमी एकच सांगितले, प्रयत्न करत राहा. त्याच विचारातून हा संपूर्ण तपशील समोर आणण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांना नेमके काय घडले हे कळले पाहिजे, हीच भूमिका त्यांनी मांडली.

    दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का?

    रोहित पवार यांनी दावा केला की, अपघातापूर्वी काही घडामोडींमुळे दादांचा वेळ मुद्दाम वाया घालवला गेला का, याची चौकशी व्हावी. एका नेत्याच्या फाईलमुळे उशीर झाला, पक्षातील एका नेत्याची भेट उशिरा झाली, आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला, यामागे काही नियोजन होते का, असा सवाल त्यांनी केला.

    विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीत चेकलिस्ट पद्धत नसणे, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर बंद असणे, मेंटेनन्समध्ये त्रुटी, पायलटांवर दबाव, स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद असणे, दुसरा ‘गो अराऊंड’ न घेणे, इंधन बचतीसाठी घाई करणे अशा बाबींची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

    या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक संस्थांकडून नव्हे तर परदेशी तपास यंत्रणांकडूनही व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी स्पष्ट मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अपघातानंतरही या कंपनीच्या विमानातून मंत्री प्रवास करतात, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

    ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी आहे, पण भारतात काहीच कारवाई का केली नाही? ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. पण त्याचा पुढे काहीही तपास झाला नाही. दोन वर्षांपासून त्याचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दाबला का?

    ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानात काय बिघाड झाला होता? ते खाली येताना एका बाजूला कलल्याचे दिसले, त्याचे कारण काय? विमानाचे रूटिन मेंटेनन्स झाले नव्हते का, ते कुणी केले होते, विमानाचा हँगर सीसीटीव्ही कुठेय, विमानाच्या हेव्ही मेंटेनन्स कधी झाला होता, त्याचा अहवाल कुठे आहे?

    विमानाचे मेकॅनिकल फेल्युअर झाले असेल काय? टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी झाली होती का? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहे?

    अजितदादांचा प्लॅन कुणी बदलवला का? ते बारामतीला कारने जाणार होते. पण एका नेत्याच्या सांगण्यावरून फाईलवर सही करण्यासाठी थांबले. त्याला उशीर झाला. तसेच त्यांच्या पक्षाचा एक नेता त्यांना भेटण्यासाठी उशिरा आला. त्यामुळे दादांनी विमानाने जायचे ठरवले.

    अजितदादांच्या विमानाने दुसरा गो अराऊंड का घेतला नाही? कंपनीने पायलटला इंधन वाचवण्याचे आदेश दिले होते का? कुणाच्याही जीवापेक्षा इंधन वाचवणे महत्त्वाचे होते का?

    अनेक गंभीर शंका उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी

    दादांचा मूळ प्रवास कारने होणार असताना शेवटच्या क्षणी त्यांना विमानाने जाण्यास भाग पाडले गेले का?
    अपघाताच्या दिवशी विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलले गेले?
    विमानाचा अपघात होत असताना पायलटने ‘मेडे कॉल’ का दिला नाही?
    ट्रान्सपाँडर का बंद होता, विमान टेकऑफपूर्वी नीट तपासले गेले होते का, टेकलॉग व एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत?
    व्हीएसआर कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिले आणि त्याचा अहवाल सार्वजनिक का होत नाही?

    Ajit Pawar Death: Rohit Pawar Alleges Conspiracy; Questions Pilot & VSR Aviation

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अजितदादांच्या स्मारक संग्रहालयावरून त्यांच्या दोन मुलांमध्ये वाद, की वादाच्या निमित्ताने दोन शहरांमध्ये दोन संग्रहालये बांधायचा घाट??

    CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- ‘राष्ट्रवादी’चे विलीनीकरण झाले तर बोलणार; हवेत पतंगबाजी का करायची?

    Ranveer Singh : रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी; व्हॉट्सॲप व्हॉइस नोट पाठवून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितली