प्रतिनिधी
मुंबई : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले होते. तेव्हा काँग्रेसकडून मुख्यमंत्री पद घेता येणे शक्य होते. ते तसे घेतले असते तर महाराष्ट्रातले बरेच चित्र बदललेले दिसले असते. मुख्यमंत्री पद न स्वीकारण्याचा राष्ट्रवादीचा नेतृत्वाचा निर्णय चुकला होता, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी एका मुलाखतीत केले होते. Rohit patil son of r. r. patil contradicted ajit Pawar’s statement over chief ministership decision of NCP leadership in 2004
मात्र अजितदादांच्या या वक्तव्याला आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटलांच्या एका वक्तव्यातून छेद गेला आहे. 2004 मध्ये शरद पवार यांनी विशिष्ट राजकीय परिस्थितीत निर्णय घेऊन मुख्यमंत्री पदापेक्षा जास्तची मंत्रिपदे तरी राष्ट्रवादी कडे घेतली होती. तेव्हा तो निर्णय आम्हा सगळ्यांना मान्य होता. आजही पवार साहेब सांगतील तोच निर्णय मान्य असेल. त्यामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पवार साहेब सांगतील तोच असेल, असे वक्तव्य रोहित पाटलांनी केले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यातूनच अजित दादांच्या वक्तव्याला छेद गेला आहे.
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुख्यमंत्रीपद न घेण्याचा 2004 चा निर्णय चुकल्याचे वक्तव्य अजित दादांनी केले होते. मात्र तो निर्णय तेव्हा सर्वांना मान्य असल्याचे वक्तव्य करून रोहित पाटलांनी त्या वक्तव्याला छेद दिला आहे. 2004 मध्ये रोहित पाटील अतिशय लहान म्हणजे सहा वर्षांचे होते आणि आर. आर. आबा पाटील त्यावेळेला राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या पदांवर होते. राष्ट्रवादीत त्यावेळी अनेकांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या होत्या. या महत्त्वाकांक्षा मॅनेज करणे शरद पवारांसाठी जिकीरीचे झाले होते.
2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 आमदार विधानसभेत निवडून आले होते, तर काँग्रेसचे 69 आमदार विजयी झाले होते. तरी देखील महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा 13 दिवसांचा राजकीय घोळ झाला. अखेरीस काँग्रेसचे त्या वेळचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्रात येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवला. काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद घेतले आणि राष्ट्रवादीला दोन कॅबिनेट जादाची मंत्रिपदे दिली.
पण शरद पवारांचा हाच निर्णय अजितदादांना आता चुकीचा वाटला आहे, तर रोहित पाटलांना तो योग्य असल्याचे वाटले आहे.
Rohit patil son of r. r. patil contradicted ajit Pawar’s statement over chief ministership decision of NCP leadership in 2004
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने क्रीडा तज्ज्ञाला काढून टाकले, भारताचा सवाल- ही कसली पत्रकारिता?
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पुढील वर्षी पूर्ण होणार देहू-आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग, मार्ग चौपदरी होण्याची गडकरींची ग्वाही
- हैदराबादेत पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आज CISF स्थापना दिन परेडमध्ये होणार सहभागी
- P.M.मोदींचे सानिया मिर्झाला पत्र, इतर खेळाडूंना मिळाले इन्स्पिरेशन!