वृत्तसंस्था
पुणे : ,अलिकडेच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर पुण्यातील निगडीत प्राणघातक हल्ला झाला आहे. Robber Attack On Actress Sonalee Kulkarni Father
हल्लेखोर सोनालीचा चाहता असून त्याने सोनालीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. निगडी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.
सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर आहे. आरोपी अजय शेगटे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दारात आला. त्यावेळी सोनालीचे आई-वडील घरात होते.
वडिल मनोहर कुलकर्णी ( वय 63) यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजयने त्यांच्यावरच चाकूने हल्ला केला. झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत.
चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याची तक्रार कुलकर्णींनी पोलिसांकडे दिली आहे. आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळला आहे.
रहिवाशांनी अजयला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजयने आपण सोनाली कुलकर्णीचा फॅन असल्याचे सांगितले. निगडी पोलिस तपास करत आहेत.
Robber Attack On Actress Sonalee Kulkarni Father
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नाशासाठी बेळगावात भाजपच्या आमदाराकडून यज्ञ; होमहवनाचा पेटलेला गाडा शहरात फिरवला
- फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?
- RBI Guideline : जिल्हा मध्यवर्ती बँकांचा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारची शिफारस गरजेची
- डाळींच्या वाढत्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल, राज्यांना दिले ‘हे’ निर्देश
- महाराष्ट्र पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या : जयजितसिंग यांच्या जागी आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल हे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख