• Download App
    Devendra Fadnavis एमएमआर ग्रोथ हबच्या माध्यमातून 300

    Devendra Fadnavis : एमएमआर ग्रोथ हबच्या माध्यमातून 300 अब्ज डॉलर जीडीपीचा रोडमॅप

    Devendra Fadnavis

    अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र टीमची स्थापना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडली, ज्यात एमएमआर क्षेत्राचे सकल उत्पन्न 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलरवर नेण्याच्या दिशेने योजनांची अंमलबजावणी करण्याचा आढावा घेण्यात आला.Devendra Fadnavis

    या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआर ग्रोथ हब अंतर्गत सुरू असलेल्या 37 प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याचे निर्देश दिले. पर्यटन, उद्योग, नगरविकास, पर्यावरण, गृहनिर्माण आदी क्षेत्रांतील प्रकल्प हे जागतिक दर्जाचे असावेत, यासाठी सतत संनियंत्रण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी या प्रकल्पांचा वॉररूममध्ये समावेश करून त्यांचा अहवाल डॅशबोर्डवर प्रदर्शित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र टीमची स्थापना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.



    सप्टेंबर 2024 मध्ये तयार करण्यात आलेल्या ग्रोथ हब अहवालात सुमारे 8 धोरणे, 19 शासन निर्णय, आणि 7 अंमल बजावणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. गोरेगाव फिल्मसिटीतील आयआयसीटी, एमबीपीटीचा पुनर्विकास, वाढवण पोर्ट, पश्चिम उपनगरातील विशेष क्षेत्र, डेटा सेंटर, आरोग्य शहरे, परवडणारी घरे, पर्यटनवाढ प्रकल्प इत्यादी या ग्रोथ हबचा भाग असणार आहेत.

    ‘वेव्ज’ कार्यक्रमाच्या निमित्ताने एमएमआर ग्रोथ हबची व्यापक सादरीकरण करून प्रभावीपणे प्रसिद्धी केली जावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Roadmap to 300 billion Doller GDP through MMR Growth Hub

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!