विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. Fadnavis Cabinet Decision
– मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय असे :
• अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार, ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार (जलसंपदा, विभाग)
• महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )
• अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौरस मीटर जागा (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)
• अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन, अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती (सामाजिक न्याय विभाग)
• भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद. हे पद पदोन्नती आणि विभागीय भरतीद्वारे भरता येणार. राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (महसूल विभाग)
• राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा. बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (दिव्यांग कल्याण विभाग)
River Rejuvenation Authority Established in Maharashtra; Fadnavis Cabinet Decision
महत्वाच्या बातम्या
- विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांनाच नेता निवडा, असे शरद पवारांचे कोणीही नेते म्हटले नाहीत; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
- Telangana : तेलंगणामध्ये पॅरेंटल सपोर्ट बिल मंजूर; आई-वडिलांना निराधार सोडल्यास 15% पगार कपात
- NASA : 50 वर्षांनंतर नासाचे चंद्र मिशन; आर्टेमिस-2 मिशनची पहिली महिला असेल क्रिस्टीना; संघात 4 अंतराळवीर
- Trump : अमेरिकेची इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करण्याची तयारी; ट्रम्प 10 हजार अतिरिक्त सैनिक पाठवत आहेत