प्रतिनिधी
सातारा : सोशल मीडियावर महापुरुषांबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे पडसाद उमटून दंगल झाली. त्यातून काहींनी घरे आणि दुकाने पेटवून दिली आणि दगडफेक केली. Riots in Pusesawli in Satara
दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला. एका प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याची बातमी आहे. यात 10 जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद केली असून कराडमध्ये दक्षतेची उपाययोजना म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात सर्व नागरिकांनी शांतता पाळण्याचे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
इंटरनेट सेवा बंद
संबधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा पोलिस मुख्यालयातून मोठा पोलिस फौजफाटा येथे तैनात करण्यात आला आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आक्रमक जमावाने प्रार्थनास्थळात घुसून आतमधील युवकांना मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात राडा
जमावाने रस्त्यावर उतरत गोंधळ घातल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य ओळखत जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुसेसावळी येथील एका व्यक्तीने सोशल मिडीयावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून लोकांचा गैरसमज झाला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. सदर ठिकाणी तात्काळ पोलिस अधिकारी आणि अंमलदार स्टाफने दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
पुसेसावळीतील एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन रात्री उशीरा युवकांच्या मध्ये दंगल उसळली. या दंगलीत व जाळपोळीत 2 दुकाने आणि 2 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. प्रार्थना स्थळाची नासधूसही करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह 2 डीवायएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Riots in Pusesawli in Satara
महत्वाच्या बातम्या