शहरात अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू
विशेष प्रतिनिधी
अकोला : शहरात काल मध्यरात्री हरिपेठ भागात दोन गटांमध्ये वाद होऊन, त्यानंतर दंगल मोठी दंगल उसळली. दोन गटातील या राड्यात जाळपोळ आणि रस्त्यांवरील वाहनांची मोठ्याप्रमाणा तोडफोड झाली. एवढच नाहीतर चक्क पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. या दंगलीत दहा जण जखमी झाले आहेत. Riot broke out in Akola Stone pelting and arson 10 injured
दंगलखोरांनी रस्त्यावरील वाहनं पेटवली होती तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांचेही मोठे नुकसान झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शहरात अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार सोशल मीडियावर एकाने वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर वाद उद्भवला.
संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अकोला शहरात मोठ्याप्रमाणात पोलीसफौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
Riot broke out in Akola Stone pelting and arson 10 injured
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??