प्रतिनिधी
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज लोकसभेत जोरदार गौप्यस्फोट केला. रिया चक्रवर्तीच्या फोनवर ए. यू. नावाने 44 फोन कॉल होते. ए. यू. म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा खुलासा बिहार पोलिसांनी केल्याचा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे. Rhea Chakraborty to A. U. Namely 44 phone calls of Aditya Thackeray
आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत आणि त्यांच्या संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अतिशय वाढले आहे. सुशांत सिंग संशयास्पद मृत्यू प्रकरणात संशयाची सुई विविध मार्गांनी आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत बाहेरून पोहोचत होतीच. परंतु आता प्रत्यक्ष संसदेचे अधिवेशन सुरू असताना लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उघडपणे नाव घेऊन आरोप केल्याने या एकूण प्रकरणाला वेगळे गंभीर वळण लागले आहे.
परंतु, शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांचे आरोप फेटाळून लावले असून राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असे आव्हान कायंदे यांनी दिले आहे.
ए. यू. चा विषय खूप गंभीर आहे. ए. यू. म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणात सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी वेगवेगळा तपास केला आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.
मनीषा कायंदेंचा पलटवार
राहुल शेवाळे यांना आदित्य ठाकरेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने तक्रारी केल्या आहेत. याची दखल अजून कोणीही घेतली नाही, त्या तक्रारींचे काय झाले? त्या महिलेची तक्रार का घेतली जात नाही? राहुल शेवाळे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
Rhea Chakraborty to A. U. Namely 44 phone calls of Aditya Thackeray
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात डाॅक्टर, तंत्रज्ञांच्या 4500 जागांची भरती; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनांची विधानसभेत माहिती
- चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रचंड उद्रेक, पण भारतात स्थिती नियंत्रणात; डॉ. रणदीप गुलेरियांचा विश्वास
- महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी हरलेत, तर महापालिका, झेडपी निवडणुकांमध्ये काय होईल??
- महाराष्ट्रातल्या गावांचा कल हिंदुत्ववादी पक्षांकडेच; काँग्रेस – राष्ट्रवादी पेक्षा भाजप आणि दोन्ही शिवसेना यांची दुप्पट ग्रामपंचायतींवर सत्ता