• Download App
    Reward for catching Fadnavis on the edge; NCP's candidature for Khadse !!

    विधान परिषद : फडणवीसांना धारेवर धरण्याची बक्षिसी; खडसेंना राष्ट्रवादीची उमेदवारी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजप, शिवसेना आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आपाआपले गडी उतरवले आहेत. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने धारेवर धरल्याची बक्षीस मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, स्वतः एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. Reward for catching Fadnavis on the edge; NCP’s candidature for Khadse !!

    मी गेली 30 वर्षे सातत्याने राज्याच्या राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे आमदारकीचे फार कौतुक नाही. पण ज्या परिस्थितीत मला भाजपने ढकलले, त्यानंतर जो आधार मला राष्ट्रवादीने दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

    राष्ट्रवादीने राजकीय पुनर्वसन केले

    भाजपमध्ये मला अडगळीत पडल्यासारखे वाटत होते पण राष्ट्रवादीने मला आधार देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले. त्यामुळे त्यांच्याशी प्रामाणिक राहणे हे माझे कर्तव्य आहे. आता खडसेंची राजकीय कारकीर्द संपली असं बोललं जात होतं. पण असं असताना सुद्धा शरद पवार यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो खूप मोठा आहे. त्यामुळे मी कायम त्यांचा ऋणी आहे, असेही खडसे मिळाले.

    मुंडे कुटुंबीयांवर अन्याय

    विधान परिषदेसाठी भाजपने पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे त्यावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. खरंतर मुंडे, महाजन, खडसे, फुंडकर यांनी मारवाडी आणि ब्राह्मण अशी ओळख असलेल्या भाजपला बहुजन समाजाचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांचा भाजपचा विस्तार करण्यात मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देणं हा त्यांच्यावर अन्याय असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

    Reward for catching Fadnavis on the edge; NCP’s candidature for Khadse !!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा