• Download App
    Revised plan of Rs 36.35 crore approved for Jain Kumbh Mela Namokar pilgrimage site; Kumbh Mela in February 2026 पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित गावातील प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

    जैन कुंभमेळा णमोकार तीर्थक्षेत्रासाठी 36.35 कोटींचा सुधारित आराखडा मंजूर; फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभमेळा

    Chief Minister

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा – णमोकार तीर्थक्षेत्र मालसाणे, ता. चांदवड, जि. नाशिक येथील जैन समाजाच्या श्री णमोकार तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा मंजूर केला.Revised plan of Rs 36.35 crore approved for Jain Kumbh Mela Namokar pilgrimage site; Kumbh Mela in February 2026

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे नाशिक येथील जैन समाजाच्या णमोकार तीर्थक्षेत्र येथे पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळा आयोजनासंदर्भात शिखर समितीची बैठक झाली.

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाचे श्री क्षेत्र णमोकार तीर्थ हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाला विशेष लक्ष देऊन दर्जेदार कामे करण्याचे व ही कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. फेब्रुवारी महिन्यात श्री क्षेत्र णमोकार तीर्थ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळ्या’साठी सुमारे 10 ते 12 लाख भाविक येणे अपेक्षित असून, भाविकांच्या सोयीसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन कामांच्या एकूण ₹36.35 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला यावेळी मंजुरी देण्यात आली.



    हे तीर्थक्षेत्र धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने येथे आंतरराष्ट्रीय आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ते, पार्किंग, तात्पुरती निवास व्यवस्था, नौकानयन, वीजपुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण आणि संरक्षण भिंतीचे बांधकाम यासारखी कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या विकास आराखड्यात कायमस्वरूपी कामांसाठी आणि महोत्सवाच्या नियोजनासाठी तात्पुरत्या कामांचा समावेश आहे, ज्यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, सीसीटीव्ही यंत्रणा, हेलिपॅड आणि वैद्यकीय सुविधांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिखर समितीच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली असून प्रशासनाकडून महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. राहुल आहेर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    Revised plan of Rs 36.35 crore approved for Jain Kumbh Mela Namokar pilgrimage site; Kumbh Mela in February 2026

    महत्वाच्या बातम्या

    
    					

    Related posts

    इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधींची सोंगटी पुढे ढकलली; त्याच दिवशी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” झाली!!

    पवारांच्या राजकारणाची बालेकिल्ल्यात फलश्रुती; नाशिक मध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट; पुण्यामध्ये काका – पुतण्यांना काँग्रेसची गरज!!

    पुण्यात काँग्रेसला बरोबर घेऊन पवार काका – पुतणे काँग्रेसचे बळ वाढविणार, की काँग्रेसची political space खाऊन टाकणार??